Cooking Tips For Diwali Faral: दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशावेळी फराळाला सुरुवात केली जाते. दिवाळीचा संपूर्ण फराळ करायचा म्हटलं की खूप वेळ जातो. चकल्या, लाडू आणि करंजी करण्यासाठी खूप वेळ लागतो. लाडू बनवणे म्हणजे त्याचा पाक नीट व्हावा लागतोत नाहीतर लाडू नीटसे वळत नाहीत. तर कधी कधी त्यामुळं लाडू कडक होतात किंवा मऊ होतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की रव्याचे लाडू फसत असतील? तर जाणून घ्या सोप्या टिप्स 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रव्याचे लाडू झटपट आणि अगदी काही मिनिटांत तयार होतात. पण कधीकधी लाडू फसतात. त्यासाठी काही टिप्स लक्षात ठेवा. या टिप्स वापरुन तुन्ही रव्याचे लाडू केले तर तोंडात टाकताच विरघळणारे लाडू होतील, ही रेसिपी नक्की ट्राय करुन पाहा. 


साहित्य 


रवा, तूप, बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स,मनुके, सुकं खोबरं, पाणी, वेलची पूड


कृती


सगळ्यात आधी कढाई गॅसवर ठेवा. कढई चांगली तापल्यानंतर त्यात 2 चमचे तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यात एक वाटी बारीक चिरलेले ड्रायफ्रुट्स घालून चांगले भाजून घ्या. नंतर भाजलेला सुकामेवा एका वाटीत काढा. आता पुन्हा कढाईत दोन चमचे तूप घाला तूप गरम झाल्यानंतर त्यात 1 कप मोठा रवा घालून चांगला खरपूस भाजून घ्या. 


रवा भाजून झाल्यानंतर किसलेले सुरं खोबरं घालून मिक्स करुन घ्या. दुसऱ्या गॅसवर एक भांड ठेवून त्यात अर्धी वाटी साखर आणि थोडं पाणी घालून पाक तयार करा. आता तयार पाक रव्याच्या मिश्रणात घालून मिश्रण चांगलं एकजीव करुन घ्या. मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात ड्रायफ्रुट्स टाकून मिक्स करा आणि हाताला तूप लावून लाडू वळायला घ्या. 


रव्याचे लाडू कडक झाले तर काय कराल?


- लाडू वळताना आपल्याला अंदाज येत नाही की लाडू कडक झालेत की नरम. पण लाडू दगडासारखे कडक झाले असतील तर पाक खूप घट्ट किंवा दाटसर न करता पाक साखर आणि पाण्याचे योग्य प्रमाण घेऊन पातळसर करावा. पाक तयार होत आला की त्याची तार नीट तपासूनच त्यात रव्याचे मिश्रण टाकावेत. 


- पाकाचे आणि रव्याचे प्रमाणही योग्य हवे नाहीतर लाडू कडक होण्याची शक्यता असते. 



(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)