Did You Know Why Do Newspapers Print Coloured Dots: सध्याच्या सोशल मीडियाच्या जगामध्येही प्रसारमाध्यमांचं महत्त्व टिकून आले. खास करुन वृत्तपत्रांचं महत्त्व आजच्या सोशल मीडियाच्या जगातही कायम असून फेक न्यूज आणि व्हायरल बातम्यांच्या जमान्यामध्ये वृत्तपत्रांची विश्वासर्हता अधिक वाढली आहे. प्रिंट मीडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छापील वृत्तपत्रं ही सर्वात जुन्या प्रसारमाध्यमांपैकी एक आहे. आजही डिजीटल जगामध्ये सकाळी पेपर वाचल्याशिवाय अनेकांचा दिवस सुरु होत नाही. त्यामुळेच वृत्तपत्रं आजही तग धरुन आहेत.


तुम्हीही पाहिले असतील हे गोळे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृप्तपत्र वाचताना एक गोष्ट तुमच्याही लक्षात आली असेल तर की पानांच्या तळाशी काही रंगीत गोळे असतात. सामान्यपणे हे गोळे पिवळ्या, गुलाबी, निळ्या आणि काळ्या रंगाचे असतात. वृप्पत्राच्या सर्व पानांच्या तळाशी हे गोळे उभे किंवा आडवे छापलेले असतात. हे गोळे केवळ सजावट म्हणून छापले जातात असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात. हे रंगीत गोळे छापण्यामागे एक विशेष कारण असतं. या कारणाबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. या गोळ्यांचं महत्त्व आपल्यापैकी अनेकांना वाचक म्हणून ठाऊक नसतं.


छपाईसाठी ही रंगसंगती वापरतात


कोणत्याही छापील गोष्टी या सीएमव्हायके किंवा आरजीबी या कलर कॉम्बिनेशनमध्ये छापलं जातं. सीएमव्हायके रंगसंगतीमध्ये सियान, मेजेंडा, यल्लो आणि की कलर म्हणजेच काळा रंग वापरला जातो. तर आरजीबीमध्ये रेड, ग्रीन आणि ब्लू हे 3 रंग वापरले जातात. वृत्तपत्रांची छपाई ही सीएमव्हायके रंगसंगतीमध्येच होते. सीएमव्हायके ही मोठ्या संख्येनं आणि त्याचवेळी स्वस्तात छपाई करण्यासाठी अगदी उत्तम असते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने एका दिवसात किती वृत्तपत्र छापली गेली हे ही समजू शकतं. त्यामुळे आजही जवळपास सर्वच वृत्तपत्रं याच रंगसंगतीचा वापर करतात.


असा होतो वापर


वृत्तपत्राचं प्रत्येक पान छापताना त्याच्यावरील फोटो आणि माहितीमधील या सीएमव्हायके रंगसंगतीमधील वेगवेगळ्या प्लेट्स तयार केल्या जातात. वृत्तपत्राच्या पानाच्या आकाराच्या या धातूच्या प्लेट्स असतात. छपाईसाठीचा मजकूर या प्लेट्सवर घेतल्यानंतर त्या एकावर एक ठेऊन अचूकपणे छापल्या जातात. तर असं झालं नाही तर फोटो ब्लर झाल्यासारखे दिसतात. म्हणजेच एका फोटोतील पिवळा आणि लाल रंग असेल तर तो वेगवेगळ्या प्लेटमध्ये अरेंज केलेला असता. या प्लेट अचूकपणे खालील कागदावर उमटल्यास फोटो उत्तम प्रकारे छापून येतो. त्यामुळेच या प्लेट अचूकपणे सेट झाल्या आहेत की नाही हे तपासण्यासाठी आणि प्लेटवरील कलर कागदावर कसा उमटतोय ते पाहण्यासाठी या डॉट्सच्या माध्यमातून अधी चाचपणी केली जाते. जर प्लेट्स पुढे मागे सरकल्या तर फोटो ब्लर येतात. खालील फोटो पाहून तुम्हाला नेमकं समजू शकेल...



आता यापुढे वृत्तपत्र वाचताना त्यामधील फोटोंच्या कडा ब्लर दिसल्या तर समजून जा की छपाईदरम्यान या प्लेट्स पुढे मागे झाल्याने हा गोंधळ झाला आहे.