Relationship Tips :  प्यार दोस्ती है, अगर वो मेरा सबसे अच्छा दोस्त नहीं बन सकता... कुछ कुछ होता है या चित्रपटातील किंग खान शाहरुखचा हा संवाद आजही प्रत्येकाचा मनात घर करुन आहे. प्रेम म्हणजे काय असं विचारलं असता प्यार दोस्ती है, असं जेव्हा शाहरुख खानने म्हटलं त्यानंतर अनेक तरुण तरुणी आजही आपल्या बेस्ट फ्रेंडमध्ये आपला जीवनसाथी शोधत असतात.  खरं तर कोणत्याही नात्याची सुरुवात ही मैत्रीपासून होते. या जगात जेव्हा आपण येतो तेव्हा काही नाती ही आपल्या रक्ताची असतात. पण मैत्री हे असं नातं आहे जे आपण बनवतो. लहानपणापासून मोठ्यापणी आपल्या आजूबाजूला भेटणारे लोकांतून कोणतरी खास जो आपल्या प्रत्येक गोष्टीत सोबत असतो, ती म्हणजे मैत्री. मैत्री ही वयाच्या कुठल्याही टप्प्यात होऊ शकते. शिवाय मैत्रीमध्ये वयाची मर्यादाही नसते ना पुरुष महिला असा भेदभावही नसतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येकाच्या आयुष्यात एक बेस्ट फ्रेंड तर नक्कीच असतो. पण जेव्हा या मैत्रीत प्रेम येतं तेव्हा अनेक नाती ही फुलतात तर काही नात्यांना कायमचा ब्रेक लागतो. आपण आपल्या चांगला मित्राला गमावून बसतो. खरं तर अनेक वेळा आपण बेस्ट फ्रेंडच्या प्रेमात पडलो आहे, किंवा आपला बेस्ट फ्रेंड आपल्या प्रेमात पडला आहे, हेच कळत नाही. मैत्री आणि प्रेमामध्ये एक छोटासा फरक असतो. तो जर कळला तर मैत्रीचं नातं कायम तसंच राहतं. तर आज आपण रिलेशनशिप या विशेष लेखात रिलेशनशिप कौन्सिलर आपण मैत्रीचे प्रेमात रूपांतर होण्याची चिन्हे काय आहेत याबद्दल समजून घेणार आहोत. (Did your best friend not fall in love with you friendship love signs Relationship Tips in marathi)


मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊ शकतं का?


रिलेशनशिप कौन्सिलर म्हणतात, की एक तरुण आणि तरुणी जर बेस्ट फ्रेंड असतील. तर मैत्रीचं रुपांतर प्रेमात होणं खूप सर्वसामान्य गोष्ट आहे. तुमच्या मित्राबद्दल तुमच्या मनात रोमँटिक भावना असतील तर यात काहीही गैर नसतं. तज्ज्ञ सांगता की, ज्या नात्यामध्ये मैत्री असते ते नातं खूप सुंदर आणि सकारात्मक असतं. तुमचं प्रेमाच नात अधिक मजबूत करतं. कारण तुम्ही आपल्या बेस्ट फ्रेंडची चांगली आणि वाईट दोन्ही बाजू माहिती असते. तुम्ही एकमेकांच्या भावना समजून घेण्यासाठी समक्ष असता म्हणून तुमची मैत्री झालेली असते. त्यामुळे अशी नाती ही दीर्घकाळ टिकतात. पण तुमची बेस्ट फ्रेंड तुमच्या प्रेमात तर नाही असं कसं ओळखाल, याबद्दल तज्ज्ञ 11 संकेत सांगतात. 


जेव्हा संभाषण खूप जास्त होतो!


जेव्हा मैत्रीचं नातं हे प्रेमाच्या दिशेने पुढे जात असतं. तेव्हा तुमच्यामध्ये नेहमीपेक्षा अधिक संवाद होऊ लागतात. बेस्ट फ्रेंडच्या आयुष्यातील प्रत्येक लहान मोठी गोष्ट तुम्हाला माहिती असते. अगदी तुमच्याही सगळ्या गोष्टीत तुम्ही त्याला सहभागी करुन घेता. दिवस असो वा रात्र कधीही तुम्ही त्याच्याशी कुठल्याही विषयावर झोप तहान विसरुन तासनतास गप्पा मारता. 


जेव्हा तुमच्या जोडीदाराबद्दल मत्सर वाटतो...


जेव्हा तुमचा बेस्ट फ्रेड तुमच्या जोडीदाराबदद्ल किंवा एक्स जोडीदाराबद्दल मत्सर वाटणाऱ्या गोष्टी करत असेल तर याचा अर्थ तो तुमच्या प्रेमात पडला आहे. सोबत तो तुमच्या जोडीदाराबद्दल नकारात्मक बोलत असेल किंवा बोलणंच टाळत असेल अगदी जोडीदाराच नावही घेतलं तर बेस्ट फ्रेंड चिडत असेल तर हे देखील प्रेमाच लक्षण आहे. 


जर बेस्ट फ्रेंडची देहबोली अचानक बदलते!


तुमच्या बेस्ट फ्रेंडच्या देहबोलीतील अचानक तुम्हाला बदल जाणवत असेल. जर तो तुमच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असेल किंवा जास्त काळ डोळ्यांशी संपर्क साधत असेल तर याचा अर्थ तो तुमच्या प्रेमात पडलाय. 


जेव्हा तो तुमच्याशी फ्लर्ट करतो


जर अचानक तुमचा बेस्ट फ्रेंड तुमच्यासोबत फ्लर्टिंग करायला लागला. म्हणजे त्याचा मनात तुमच्या विषय प्रेमाची भावना निर्माण झाली आहे. 


तुमच्या बेस्ट फ्रेंडला तुमच्या कुटुंबात रस वाटतो!


जेव्हा एखादा मित्र तुमच्याकडे आकर्षित होतो, तेव्हा त्याला वैयक्तिक प्रश्न विचारून तुमच्याबद्दल सर्व काही जाणून घ्यायचं असतं. तो तुमच्या कुटुंबाशी जोडण्याचाही प्रयत्न करतो. याचा अर्थ त्याला आपल्याशी प्रेमाच नातं बनवायचं आहे. 


तुम्हाला सरप्राइज देतो !


तुमच्या बेस्ट फ्रेंडला तुमच्याबद्दल प्रेम असेल तर तो तुमच्या खास क्षणाला अधिक खास करण्यासाठी खूप मेहनत घेतो. तुमच्यासाठी अनेक वेळा सरप्राइज पार्टी किंवा तुमच्या आवडीच्या अनेक गोष्टी करतो. 


तुमच्या स्वप्नात साथ देतो


तुमचा बेस्ट फ्रेंड तुमच्या प्रेमात असेल तर तर तो तुम्हाला कुठल्याही प्रसंगात एक सोडत नाही. तुमच्या स्वप्नांसाठी तो तुमच्या पाठीशी उभा असतो. तुम्हाला भावनिक आणि नैतिक अगदी पैशांचीही गरज पडल्यास खंबीरपणे तुम्हाला साथ देतो. 


बेस्ट फ्रेंड तुमच्या प्रेमात पडल्यावर काय करावं?


खरं तर तुमचं नात कसं आहे यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. जर तुम्ही अविवाहित आहात आणि दुसऱ्या कुठल्याही नात्यात नसाल तर ही परिस्थिती हाताळणे सोप होतं. पण विवाहित असाल किंवा तुम्ही दुसऱ्या कोणाला प्रेमाचे वचन दिलं असेल तर अशावेळी ही परिस्थिती कठीण होते. 


जर तुम्ही वर्षानुवर्षे जवळचे मित्र असाल, तर तुम्हालाही त्या व्यक्तीबद्दल प्रेम असेल तर मैत्री ते प्रेम हा प्रवास हळूहळू पुढे नेता येईल. परस्पर समंजसपणाने हे नाते दीर्घकाळ टिकू शकतं. मात्र कोणताही मोठा निर्णय घेण्याची घाई करू नका. पण जर तुम्हाला प्रेम नसेल तर त्याला तुमची भावना समजून सांगा. या विषयावर स्पष्ट एकमेकांशी बोला. 


प्रेमाचा मैत्रीवर कसा परिणाम होतो?


तुमचा मित्र नात्याबद्दल गंभीर आहे. यासाठी तो तुम्हाला प्रपोज करतो. पण हे नातं फक्त मैत्रीपुरतं मर्यादित ठेवायचं असेल तर त्याचा नकारात्मक परिणाम मैत्रीवर होऊ शकतो. यामुळे केवळ मैत्रीच तुटत नाही तर नातेही बिघडते.