तुम्हालाही थांबून थांबून लघवी होते का? हे गंभीर समस्येचं लक्षण; दुर्लक्ष पडेल महागात
Causes Of Urination Flow Difficulty: तुम्हालाही थांबून थांबून लघवी होते का? वर वर पाहता ही सामान्य बाब वाटत असली तरी या समस्येकडे गांभीर्याने पाहिलं पाहिजे. ही अशी समस्या का निर्माण होते? त्याची करणं काय हे पाहूयात...
Causes Of Urination Flow Difficulty: आपण 100 टक्के तंदरुस्त आहोत, असं आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणीच सांगू शकत नाही. खरं तर आपलं आयुष्य हल्ली एवढं वेगवान आणि धावपळीचं झालं आहे की आपल्यापैकी अनेकांना आरोग्यासंदर्भातील काही ना काही सामस्या असतात. बरं या सामस्या कायम औषधं घ्यावी लागतील. उपचार घ्यावे लागतील अशाच असतात असंही नाही. अगदी साध्या साध्या गोष्टीची शरीरामध्ये काहीतरी गडबड असल्याचं सूचित करत असतात. मात्र आपल्याला हे संकेत कळतातच असं नाही. अशीच एक समस्या म्हणजे थांबून थांबून लघवी करणे.
थांबून थांबून लघवी होणे ही तुम्हाला सामान्य बाब वाटत असेल मात्र थांबून थांबून लघवी होणे फार गंभीर आजाराचं लक्षण आहे. म्हणूनच अशी थांबून थांबून लघवी का होते? यामागील कारणं काय आहेत? हे सारं समजून घेणं फार महत्त्वाचं ठरतं. आपण या लेखामधून हेच जाणून घेणार आहोत की थांबून थांबून लघवीला लागणे हे नेमकं कसलं लक्षण आहे? असं का होतं? यामागील कारणं काय आहेत?
> थांबून थांबून लघवी होत असेल तर यामागील मुख्य कारण असतं मूत्राशलायाला झालेला संसर्ग. अगदी साध्या भाषेत सांगायचं तर किडनी इन्फेक्शनमुळे थांबून थांबून लघवी होते.
> तसेच काहीजणांच्या मूत्रमार्गामध्ये संसर्ग झाला असेल तरीही थांबून थांबून लघवीचा त्रास जाणवतो. अशावेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.
> मधुमेहाचा म्हणजेच डायबेटीजचा त्रास असलेल्या व्यक्तींनाही थांबून लघवी होण्याचा त्रास असतो. मधुमेह असणाऱ्यांना सामान्यपणे हा त्रास जाणवतो. म्हणजेच एखाद्याला मधुमेह आहे हे ठाऊक नसेल आणि त्याला थांबून लघवी होण्याचा त्रास असेल तर त्याला मधुमेह असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
> लघवी करताना सलग लघवी होत नसेल तर मूतखड्याची समस्याही नाकारता येत नाही. लघवीच्या मार्गामध्ये या खड्यांमुळे अडथळा निर्माण होतो. त्यामुळेच लघवी करताना थांबून थांबून मूत्र बाहेर पडते.
> थांबून थांबून लघवी होण्यामागील अन्य एक महत्त्वाचं कारण युटीआय म्हणजेच युरीन ट्रॅक इन्फेक्शनही असू शकतं. लघवी करताना गुप्तांगाजवळच्या त्वचेची जळजळ होण्याची समस्याही अशा व्यक्तींना जाणवते.
> मूत्राशयाच्या पिशवीमध्ये काही समस्या असेल तरीही थांबून थांबून लघवी होण्याचा त्रास होऊ शकतो. अशावेळी तातडीने आपल्या फॅमेली डॉक्टरांशी सल्लामसलत करुन योग्य ते उपचार घ्यावेत.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)