देशी तुपाची एक्सपायर डेट असते का? एकदा बनवल्यावर किती दिवस खाऊ शकतो?
देशी तुपाला एक्सपायर डेट असते का? किंवा तूप एकदा बनवल्यावर किती दिवस खाऊ शकतो? याविषयी जाणून घेऊयात.
Desi Ghee Expiry Date : देशी तूप (Desi Ghee) हे पोषकतत्वांनी भरपूर असतं ज्यामुळे भारतीय जेवणात अनेकजण त्याचा वापर करतात. जेवणात देशी तूप वापरल्यावर पदार्थाची चव आणखीनच वाढते. त्यामुळे अनेकजण देशी तूप घरात स्टोअर करून ठेवतात. पण देशी तुपाला एक्सपायर डेट असते का? किंवा तूप एकदा बनवल्यावर किती दिवस खाऊ शकतो? याविषयी जाणून घेऊयात.
देशी तूप एक्सपायर होतं का?
देशी तूप एक्सपायर होतं का? या प्रश्नाचं उत्तर आहे हो. इतर गोष्टींप्रमाणे देशी तूप सुद्धा खराब होऊ शकते. बाजारातून आणलेल्या देशी तुपावर एक्स्पायरी डेट लिहिली जाते. त्या वेळेपर्यंतच तुम्ही ते तूप वापरू शकता. तुम्ही घरी बनवलेले देशी तूपही खराब होऊ शकते. जेव्हा देसी तुपाचा वास आणि चव बदलू लागतो, तेव्हा समजून घ्या की ते खराब झाले आहे.
हेही वाचा : तुम्ही खात असलेली काजू कतली भेसळयुक्त तर नाही ना? वापरा 'या' टिप्स 2 सेकंदात कळेल
तूप कसं स्टोर करावं?
जर देशी तूप तुम्ही योग्यप्रकारे स्टोर केलंत तर ते 3 वर्ष खराब होत नाही. यासाठी तुम्हाला देशी तूप हे एअर टाईट कंटेनरमध्ये स्टोर करू शकता. तूप साठवत असलेल्या डब्यात हवा पास होणार नाही याची काळजी घ्या. तसेच प्रयत्न करा की देशी तूप हे अधिकतर काचेच्या बरणीतच स्टोर करा. तसेच तुम्ही तूप फ्रिजमध्ये सुद्धा ठेऊ शकता.