माजी पंतप्रधानांचे सपत्निक इच्छा मरण! व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला एकाचवेळी सोडला देह
Relationship : नेदरलँडचे माजी पंतप्रधान ड्राईस व्हॅन एग्ट आणि पत्नी युजीन यांनी एकमेकांचा हात हातात धरून घेतला अखेरचा श्वास
नेदरलँड्सचे माजी पंतप्रधान ड्राईस व्हॅन एग्ट आणि पत्नी युजीन यांचे सोमवारी कायदेशीर इच्छामरणाद्वारे निधन झाले. दोघेही बरेच दिवस आजारी असून आता त्यांचे वय वर्षे 93 इतके होते. डॉक्टरांच्या मदतीने दोघांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आणि शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांचा हात हातात धरून अखेरचा क्षण घालवला. नेदरलँडमधील कायदेशीर अधिकार संघटनेच्या म्हणण्यानुसार, त्यांना जवळच्या कबरमध्ये दफन करण्यात आले.
एग्ट यांचे त्यांची पत्नी यूजीनवर खूप प्रेम होते. काही वर्षांपूर्वी यूजीन यांनी सांगितलं होतं की, ते अजूनही त्यांना 'माय गर्ल' म्हणून हाक मारत. शाळेच्या दिवसांपासून एकमेकांना ओळखणारे ड्राईस व्हॅन एग्ट आणि त्यांची पत्नी या दोघांनीही वयाची नव्वदी पार केली होती.
वेळ आणि दिवस स्वतः निवडले
एग्ट हे 1977 ते 1982 पर्यंत नेदरलँडचे पंतप्रधान होते. ते ख्रिश्चन डेमोक्रॅट पक्षाचे सदस्य होते. नेदरलँड्समध्ये 2000 मध्ये इच्छामरणाला कायदेशीर मान्यता देण्यात आली होती. या अंतर्गत, एखाद्या व्यक्तीला 'अशा रोगाने ग्रासले आहे जो असाध्य आहे किंवा त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास वाव नाही' अशा व्यक्तीसाठी इच्छामरणाची मागणी केली जाऊ शकते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 68 वर्षे एकत्र राहिल्यानंतर एग्ट आणि यूजीन यांनी त्यांच्या मृत्यूची वेळ आणि दिवस स्वतःच ठरवले. या काळात डॉक्टरांचे पॅनल उपस्थित होते.
एग्गेटला 2019 मध्ये ब्रेन हॅमरेज झाला होता. त्यादरम्यान ते एका परिसंवादात भाषण करत होते. अनेकवेळा त्यांनी पक्षाची सीमा ओलांडली. त्यामुळे त्यांचा विरोधही करण्यात आला होता. यामुळेच त्यांनी 2017 मध्ये पक्ष सोडला होता. ते इस्रायलचे विरोधक आणि पॅलेस्टाईनचे कट्टर समर्थक होते. या जोडप्याला तीन मुले आहेत.
(हे पण वाचा - 'आपण पुन्हा भेटू...' लग्नाच्या वाढदिवशी अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची भावूक पोस्ट)
अखेरपर्यंत दिली एकमेकांची साथ
पती-पत्नीचं नातं हे असंत असतं. या नात्यातला गोडवा मुरांब्यासारखा शेवट शेवटला तो मुरत जातं. एकमेकांसोबत 68 वर्षे एकत्र राहणे हा एक मोठा काळ आहे. एकमेकांच्या सवयीपासून ते त्यांच्या वागणुकीपर्यंतच्या सगळ्याच बाबी आपल्याला लक्षात असतात. पण हे नातं अखेरच्या काळात अशा पद्धतीनेही स्वीकारणं अत्यंत महत्त्वाचं आहे. असं स्वीकारत असताना तुमचं एकमेकांवर किती प्रेम आहे, हेच महत्त्वाची भूमिका बजावत असतो.
साथ महत्त्वाची
नेदरलँडचे माजी पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नी यांनी एकमेकांना तब्बल 68 वर्षे साथ दिली. हा काळ खूप मोठा आहे. या काळात अनेक चढ-उतार आले. अशावेळी न डगमगता एकमेकांना खंबीर साथ देणे अत्यंत महत्त्वाची आहे. ही साथ ड्राईस आणि युजीन यांनी एकमेकांना खंबीरपणे दिल्याचे कळते. कारण या काळातच तुम्ही एकमेकांशी कसे वागता यावर तुमचं नातं टिकून असतं.