Marriage Tips : मुलींना लग्नानंतर राहायचंय चिंता मुक्त, तर लग्नापूर्वीच नवऱ्याला विचारा 6 प्रश्न
Marriage Tips : लग्न करायचं म्हटलं की, आताची पिढी थेट नकार देते. कारण लग्नानंतर मुलींना कोणत्याही चिंता, काळजीला सामारे जायचे नसते. अशावेळी मुलींनी लग्न ठरल्यावरच होणाऱ्या नवऱ्याला विचारा हे 6 प्रश्न.
लग्न हे आयुष्यभर सांभाळलं जाणारं नातं आहे. या नात्यात चढ-उतार हे येतात. लग्न ठरवताना अनेक प्रश्न विचारले जातात कधी ते पालकांकडून विचारले जातात तर कधी त्या होणाऱ्या वधु-वरांकडून. प्रत्येक पालकांना वाटतं की, मुलांना लग्नानंतर अतिशय सुंदर आयुष्य अनुभवावं. पण आता थोडी परिस्थिती बदलली आहे. मुलं देखील लग्न करताना काही प्रश्न विचारतात. अशावेळी मुलींनी 6 प्रश्न लग्न करण्यापूर्वी मुलांना विचारावेत. कारण या प्रश्नांमधून तुम्हाला भविष्याचा अंदाज येऊ शकतो. ते सहा प्रश्न कोणते हे जाणून घेऊया.
मुलाच्या मुलीकडून अपेक्षा
तुम्हाला अभ्यास करायचा आहे, नोकरी करायची आहे किंवा लग्नानंतर घरी राहायचे आहे, या विषयावर होणाऱ्या नवऱ्याची अगोदर बोला. एवढंच नव्हे याबाबत त्याचे मत देखील समजून घ्या. तुमचा अभ्यास आणि करिअर त्याच्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे जाणून घेतल्याशिवाय पुढे कोणताही निर्णय घेऊ नका.
लग्नानंतरचा खर्च
लग्नानंतर खर्च कसा केला जाणार आहे, याबाबत अनेकदा कपल्सने लग्नापूर्वीच एकमेकांशी बोलून घेणं गरजेचं आहे. घरातील खर्च कोण, कसा करणार आहे. याबाबत सुरुवातीलाच मोकळेपणाने बोला.
तुमची भूमिका
लग्नानंतर तुमच्या जबाबदाऱ्या काय आहेत? तुम्ही संयुक्त कुटुंबात राहू शकाल का? तुम्ही त्या जबाबदाऱ्या सांभाळू शकाल का? असे प्रश्न मनात येतात. अशा परिस्थितीत, त्याच्या कुटुंबातील सदस्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःला तुमची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी तयार करा, जेणेकरून नंतर तुम्हाला फसल्यासारखे वाटू नये.
जबाबदारी वाटून घ्या
कुटुंबाप्रती तुमच्यावर काही जबाबदाऱ्या असतील किंवा तुम्ही एकुलते एक मूल असाल, अशा वेळी तुमच्या जबाबदाऱ्या देखील नवऱ्याला सांगणे अपेक्षित आहे. लग्नानंतर तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या जबाबदाऱ्या देखील समजून घेणे तितकेच गरजेचे आहे.
भावी नवऱ्याच्या परंपरा
प्रत्येक घराच्या चालीरीती, परंपरा वेगवेगळ्या असतात. अशा परिस्थितीत भौगोलिक अंतर हा फरक वाढवू शकतो. लग्न कोणत्या रितीरिवाजांनुसार होणार आहे ते तुम्ही त्यांना विचारू शकता आणि त्यानुसार लग्नाच्या आधी आणि नंतरची तयारी करू शकता, जेणेकरून कोणतीही अडचण येणार नाही.
जोडीदाराची निवड
नवऱ्याला पत्नीमध्ये कोणती वैशिष्ट्ये पहायची आहेत? त्याला त्याच्या फावल्या वेळात काय करायला आवडते? त्याचे छंद काय आहेत आणि त्याला काय आवडत नाही? याबद्दल जाणून घ्या. याच्या मदतीने तुम्ही केवळ स्वत:लाच तयार करू शकणार नाही, तर समोरच्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचेही आकलन करू शकाल.