वजन वाढणं ही समस्या सामान्य असली तरी आज बहुतांश लोक या समस्येमुळे त्रस्त आहेत. वाढलेली पोटाची चरबी तर कमी करणं म्हणजे मोठा टास्कच असतो. अशावेळी तुम्ही काही घरगुती  उपायांचा आधार घेऊ शकता
 
वाढत्या वजनामुळे आणि  पुढे  आलेल्या पोटाच्या समस्येमुळे अनेक जण त्रस्त आहेत. शारिरीकरीत्या फिट असूनही वजन कमी होत नाही.अनेक डाइट फॉलो करुन देखील व्यवस्थित निकाल दिसून येत नाही. या समस्येपासून कायमचा आराम मिळण्यासाठी अनेक जण ऑपरेशन देखील करतात.पोट पुढे आल्यानं (Belly Fat )   आपली 
 पर्सनॅलिटी नीट दिसुन येत नाही असं म्हटलं जातं. यासगळ्या समस्यांवर घरगुती रामबाण उपाय म्हणुन दररोज सकाळी बडिशेप आणि मेथीचं हे पाणी पिऊ शकता. हे दोन पदार्थ शरिरासाठी आणि या समस्येवर उपाय म्हणुन पिउ शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



 
 मेथी आणि  बडिशेपचं तयार करा असं पाणी 


1 चमचा बडिशेप, 1 चमचा मेथी 1 कप पाण्यामध्ये रात्रभर भिजत घाला. 


सकाळी उठल्यावर बडीशेप आणि मेथी गाळुन ते पाणी प्या. 


जर हे पाणी जास्त कडू लागत असेल तर तुम्ही त्यामध्ये मध मिक्स करु शकता. 


पाणी पिऊन झाल्यानंतर उरलेली बडिशेप आणि मेथी खाऊ शकता. यामुळे तुमची पचनसंस्था सुधारु शकते. 


 


बडीशेप आणि मेथीचं पाणी प्यायचे फायदे


डिटॉक्सर 
रोज सकाळी रिकाम्या पोटी बडीशेप आणि मेथीचं पाणी प्यायल्यानं संपुर्ण शरिर डिटॉक्स होते. 


पचनक्रिया 
मेथी आणि बडिशेप हे पचनक्रियेसाठी रामबाण औषध आहे. हे पाणी  प्यायल्यानं अ‍ॅसिडिटी, पोट साफ न होण्याची समस्या यांपासून आराम मिळतो. 


 


(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)