Gold Price Today: आज दिवाळी पाडवा आहे. आजच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळतो. तर, पती पत्नीला ओवाळणी म्हणून भेटवस्तु देतो. आज तुम्ही पत्नीला सोन्याचा एखादा दागिना गिफ्ट म्हणून द्यायचा विचार करत असाल तर आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी आज सोनं स्वस्त झालं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऐन दिवाळीत सोन्याच्या दरात वाढ झाली होती. धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याने उच्चांकी दर गाठला होता. तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोनं स्वस्त झालं होतं. आजही सोन्याच्या दरात घट झाली आहे. आज 24 कॅरेट सोनं 160 रुपयांनी स्वस्त झालं असून प्रतितोळा सोन्याची किंमत 80,400 रुपयांवर पोहोचली आहे. तर, 22 कॅरेट सोनं आज 150 रुपयांनी स्वस्त झालं असून प्रतितोळा 73,700 रुपयांवर पोहोचलं आहे. 18 कॅरेट सोन्याचे दर 60,300 रुपयांवर पोहोचले आहे. 


दिवाळीनंतर सोन्याची मागणी वाढते. कारण तुळशीविवाहानंतर लग्नसराईंना सुरुवात होते. त्यामुळं वधुसाठीचे दागिने खरेदीचा हंगाम सुरू होतो. आज सोन्याच्या दरात घट झाल्याने चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. 


आज काय आहेत सोन्याचे भाव?


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  73,700 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  80,400 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  60,300 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,370 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   8, 040 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    6, 030 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   58,960 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   64,320रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    48,240 रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट-  73,700 रुपये
24 कॅरेट- 80,400 रुपये
18 कॅरेट-  60,300 रुपये