Homemade Oil For Strong Hair: वेळी-अवेळी जेवण, प्रदूषण, अपुरी झोप, बिघडलेली जीवनशैली याचा सगळा परिणाम आरोग्यावर होत असतो. मात्र, आरोग्याबरोबरच याचा परिणाम केसांवरही होत आहे. हल्ली विशीतच तरुण मुलं मुलींना केस गळतीच्या समस्येचा त्रास होऊ लागला आहे. काही जणांना तर इतक्या लहान वयातच टक्कल पडल्याचे दिसत आहे. केस गळतीच्या या समस्येवर उपाय शोधण्यासाठी अनेकजण औषधांचा आधार घेतात. मात्र या आयुर्वेदीक उपायांनी तुम्ही घरातच एक तेल बनवू शकता. जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती.


केसगळती कशामुळं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सतत प्रदूषणाचा व धुळीचा त्रास यामुळं केस खराब होतात. केसांची योग्य काळजी घेतली गेली नाही तर केस गळणे, केस पातळ होणे, सतत केस तुटत राहते, अशा समस्या निर्माण होतात. अनेकदा अनुवंशिकता हे देखील केसगळतीचे कारण असू शकते. केसांना पोषक तत्वे मिळाल्यास केसांची गळणे काही प्रमाणात थांबू शकते.


केसगळती आणि आहार


लांबसडक व घनदाट केसांसाठी शरीराला पोषक तत्वांची गरज असते. योग्य आहार आणि पुरेशी झोप घेतल्यास ही समस्या काही प्रमाणात आटोक्यात आणू शकता. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि आयर्नयुक्त आहार घेतल्यास केस गळती थांबू शकते.


केस गळतीसाठी Red Oil


केस गळती रोखण्यासाठी तुम्ही घरच्या घरी हे आयुर्वेदिक लाल तेल बनवू शकता. हे तेल नियमीत वापरल्यास केसांची वाढ होऊन घनदाट व चमकदार होतील.


कसे बनवावे तेल?


हे तेल बनवण्यासाठी एक बीट रूट, एक कपमेथीचे दाणे आणि आल्याचे काही तुकडे उन्हात वाळवून घ्या. सगळे पदार्थ उन्हात कडकडीत वाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी मिक्सरमध्ये त्याची छान पावडर करुन घ्या.


त्या नंतर या पेस्टमधून तीन टेबलस्पून पावडर एका कापडात बांधून व्यवस्थित बांधून घ्या. त्यानंतर एका काचेच्या भांड्यात नारळाचे तेल घ्य व कापडात बांधलेली पावडर त्यात टाकून ठेवा. आता हे आणखी एक भांडे त्यात पाणी घेऊन गॅसवर ठेवा. पाणी उकळल्यानंतर त्यात तेल असलेले काचेचे भांडे टाका. याला डलब बॉयलिंग असे म्हणतात. ही प्रक्रिया झाल्यानंतर तेलाचा रंग लाल झाल्याचे दिसून येईल.


आता काचेच्या बरणीतच असलेल्या कापडाने केसांच्या मुळांना हे तेल लावून घ्या. संपूर्ण केसांना व्यवस्थित या तेलाने मसाज करुन घ्या. केसांना तेल लावून झाल्यावर दोन ते तीन तास तसंच  ठेवा.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


केसांना तेल लावून झाल्यावर दोन ते तीन तासांनी शॅम्पुने धुवून टाका. किंवा झोपायच्य आधीही तुम्ही हे तेल लावू शकता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी केस धुवून टाका. उत्तम रिझल्टसाठी आठवड्यातील दोन ते तीनवेळा तुम्ही हा उपाय करुन पाहू शकता.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)