New Year Whatsaap Status in Marathi 2024: नवीन वर्षाचं स्वागत करताना द्विगुणित करण्यासाठी जवळच्या व्यक्तींच्या शुभेच्छा नेहमीच उत्साह वाढवतात. त्यातही मागील काही वर्षांपासून व्हॉट्सअपसारख्या माध्यमातून आपल्या संपर्कात असलेल्या सर्वांना थेट स्टेटसमधून शुभेच्छा देणाऱ्यांची संख्याही बरीच मोठी आहे. व्हॉट्सअप मेसेज ब्रॉडकास्ट करण्याबरोबरच स्टेटसमधूनही नवीन वर्षानिमित्त शेअर करता येतील असे काही स्टेटस खास तुमच्यासाठी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1)


प्रत्येक वर्ष येतं प्रत्येक वर्ष जातं…
पण या नव्या वर्षात तुम्हाला
सर्व काही मिळो जे
तुम्हाला मनापासून हवं आहे.
नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.


2)


सर्व लोकांचे व्हा तुम्ही डिअर,
तुमचा मार्ग राहो ऑलवेज क्लियर
आणि देव तुम्हाला देवो झक्कास न्यू ईयर.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


3)


येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी…!


4)


नववर्षाची सकाळ होताच तुमचं
आयुष्यही व्हावं प्रकाशमय
ही प्रार्थना करू, नववर्ष तुम्हाला आणि
तुमच्या कुटुंबाला खूप खूप चांगलं जावो.


5)


गेलं ते वर्ष, गेला तो काल
नवीन आशा-अपेक्षा घेऊन आले 2024 साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


6)


काळानुसार बदला नाही तर
काळ तुम्हाला बदलून टाकेल
या नव्या वर्षात येणाऱ्या बदलांना
सकारात्मकतेने स्वीकारण्यासाठी
ऑल द बेस्ट!


7)


या वर्षात माझ्याकडून कळत नकळत कुणाचे मन दुखले असेल तर,
मला मोठ्या मनाने माफ करा आणि पुढेही असेच
आयुष्यभर माझ्यावर तुमचे प्रेम असु द्या..
आपणास व आपल्या परिवाराला येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा


8)


हे नवीन वर्ष तुम्हाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाईल.
तुम्हाला वर्षभर सुख, शांती आणि सौहार्दाचे जावो.
नवीन वर्ष आनंदात जावो


9)


गेल्या त्या आठवणी, गेल्या त्या संधी..
ह्या नवीन वर्ष करुया मेहनत आजुन थोडी..
मिळवूया जे राहिले गेल्या वर्षी..
ह्या नव्या वर्षी मिळवू नवं काही..
नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!


10)


नवीन वर्ष प्रकाश बनून आलंय आपल्या जीवनात
या वर्षात उजळून जाऊ दे भाग्याची ही रेषा
परमेश्वराची कृपा राहो सर्वांवरती खास
तुमच्या उपस्थितीने लखलखू दे हे जीवन आज
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


11)


नव्या वर्षात वाईट सवयी अंगातून झटकून
चांगल्या सवयी लावूया..
हाच ध्यास घेऊन नव्या वर्षाची सुरुवात करुया!!


12)


मला आशा आहे की नवीन वर्ष आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल..
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि आपल्या सर्व आशा पूर्ण होतील.. !
नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा..!


13)


जगातील प्रत्येक आनंद
प्रत्येक पावलावर तुम्हाला मिळो,
जगातील प्रत्येक यश तुझ्याकडे येवो.
या नव्या वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा.


14)


हे नातं सदैव असंच राहो,
मनात आठवणींचे दिवे कायम राहो,
खूप प्रेमळ होता 2023 चा प्रवास,
अशीच राहो 2024 मध्येही आपली साथ.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!


15)


पुन्हा एक नवीन वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
एक नवी दिशा,
नवी स्वप्ने, नवी क्षितिजे,
सोबत माझ्या नव्या शुभेच्छा!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!


झी 24 तासच्या सर्व वाचकांनी नवीन वर्षाच्या तुम्हाला फार साऱ्या शुभेच्छा!