How To Make Tomato Carrot Soup: वातावरणात बदल झाल्यास लगेचच त्याचा परिणाम शरिरावर होतो. सर्दी-खोकला असे आजार बळावतात. त्यामुळं आहारात अशा पदार्थांचा समावेश करायला हवा ज्यामुळं रोगप्रतिकार शक्ती वाढते. तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर असे पदार्थ खायची गरज आहे जे पौष्टिक आहेत. त्यासाठी लाल सूप हा एक उत्तम पर्याय आहे. लाल सूप हा एक चांगला पर्याय आहे. त्यामुळं शरीरा पोषण मिळते. याच्या नियमित सेवनाने सर्दी-खोकला सारखे आजार  दूर पळतात. तसंच,  हे सूप चवीलादेखील चविष्ट लागते. 


टॉमेटो-गाजरच्या सूपची रेसिपी


साहित्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 मध्यम आकाराचा बीट
2 गाजर
2 टोमॅटो
1 इंचाचा आल्याचा तुकडा
4-5 लसणाच्या पाकळ्या
अर्धा चमचा काळीमिरी
नमन चवीनुसार
1 चमचा तूप


कृती


सगळ्यात पहिले बीट, गाजर आणि टॉमेटो धुवून कापून घ्या. आता एका कढाईत तूप गरम करुन घ्या आणि यात लसूण, आलं आणि कापलेल्या भाज्या टाकून 2-3 मिनिटांपर्यंत शिजवून घ्या. आता त्यात 2 कप पाणी टाकून 10-15 मिनिटे उकळवून घ्या. भाज्या चांगल्या शिजवून घ्या. त्यानंतर एक गॅस बंद करा आणि थोडावेळ थंड होण्यासाठी ठेवा. 


मिक्सरमध्ये आता चांगलं वाटून घ्या आणि कढाईत टाकून पुन्हा चांगले ढवळून घ्या. आता यात मीठ, काळि मिरी पावडर टाकून 2 मिनिटांपर्यंत उकळून घ्या. यात क्रीम आणि पुदीनाची पाने टाकून सजवून घ्या आणि गरम गरम सूप प्यायला घ्या. 


याचे फायदे


बीट, गाजर आणि टोमॅटो यात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्ससारखे भरपूर गुणधर्म असतात. जे रोगप्रतिकार शक्ती वाढवता. त्याचबरोबर, शरीरात आयर्न, फायबरची कमतरता दूर होते. यामुळं रक्त साफ होते आणि शरिराला उर्जा मिळते. गाजरात व्हिटॅमिन ए आणि सी असते जे रोगप्रतिकर शक्ती वाढवण्यास मदत करते. सूपात काळी मिरची आणि आलं शरीरात उष्णता निर्माण करतात. तसंच, घशाची जळजळ कमी करतात. तसंच, लसणात असलेले अँटी बॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म असतात जे आजारांपासून बचावतात.