मुलांकरिता नावे निवडताना पालक अनेक गोष्टींचा विचार करतात. युनिक, हटके नावांचा विचार करताना थोडं पारंपरिक आणि आपल्या परमेश्वराचा आशिर्वाद राहावा म्हणून ही खास नावे निवडू शकतात. रघुवंशातील प्रभू रामाला आपण परमेश्वर मानतो. त्यांच्या वंशातील म्हणजेच पूर्वजांवरून तुम्ही मुलांसाठी युनिक नावे ठेवू शकतात. प्रभू श्रीरामा वरून अनेकदा रामाचे भक्त राम किंवा श्रीराम या दोनच नावांचा विचार मुलांकरिता करतात. पण आता आपण रघुवंशातील पूर्वजांच्या काही नावांचा विचार करत आहोत. कारण या नावांमध्ये रघुवंश आहे आणि त्यांचा आशिर्वाद. मुलांसाठी ही नावे अतिशय युनिक आहेत. 


राम 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राम हे संस्कृत मुलाचे नाव आहे. रामचा अर्थ "सुखद" आणि "सर्वोच्च" असा आहे. हिंदू पौराणिक कथांमध्ये, राम हा विष्णूचा सातवा अवतार आहे. रघुवंशातील 'राम' हे नाव आहे.


दशरथ 


दशरथ हे रामाचे पिता आहेत. राजाचे नाव; ज्याच्याकडे दहा रथ आहेत; भगवान रामाचा पिता, एका राजाचे नाव, दहा रथांचा मालक, भगवान रामाचा पिता, असे या नावाचे अर्थ आहेत.


अज


अज हे प्रभू रामाचे आजोबा. दशरथ राजाचे वडील. जन्मापासूनच बंधन रहित असा याचा अर्थ आहे. स्वयंबू असा देखील या नावाचा अर्थ आहे.


नाभाग


नाभाग आणि नभाग असे राजाचे नाव आहे. हे देखील तीन अक्षरे असलेले वेगळे नाव आहे. 


ययाति 


ययाती नावाचा अर्थ संस्कृतमधील नाव आहे. मल्याळम मूळ असलेले हे नाव आहे. ऋषी, भटके, प्रवासी यांचे नाव. ययाती हे नाव संस्कृत, मल्याळम मूळचे असून मुलाचे नाव आहे. ययाती नावाचे लोक सहसा धर्माने हिंदू असतात. 


नहुष 


संस्कृत मूळच्या प्राचीन शब्दाचा अर्थ 'शेजारी किंवा नातेवाईक' 'सहकारी' असा होतो. हे भगवान कृष्ण आणि भगवान विष्णू यांना प्रत्येक जीवाला गोंधळात टाकण्यासाठी मायावी शक्ती किंवा माया यांच्या संदर्भात दिलेले दुसरे नाव आहे. नहुष हे रघुवंशातील नाव आहे. 


अम्बऋषी


'अम्बऋषी' या नावाचा अर्थ खास आहे. धैर्यवान, तार्किक, करुणा असा याचा अर्थ आहे. रघुवंशातील हे नाव अतिशय खास आहे. अतिशय हटके नाव मुलासाठी निवडू शकताच.


प्रशुश्रुक 


'प्रशुश्रुक' हे नाव अतिशय वेगळं आणि युनिक आहे. रघुवंशातील हे नाव मुलासाठी ठरेल अतिशय खास. 


मरु


मरु हे हिंदू मुलाचे नाव आहे आणि मरू नावाचा अर्थ देव आहे. हे हिंदीतून आलेले नाव आहे आणि संबंधित भाग्यवान क्रमांक 8 आहे. मरू हे 2 अक्षरे असलेले छोटे नाव आहे. मरु या नावाचा विचार तुम्ही तुमच्या मुलासाठी नक्कीच करू शकता. 


शीघ्रक्


शीघ्रक् हे रघुवंशातील एक नाव आहे. अतिशय वेगळं आहे युनिक नाव आहे. 


अग्निवर्ण


अग्निवर्णाचा अर्थ असा आहे: अग्नी रंगीत. रघुवंशातील हे चार जोडाक्षरे असलेले नाव अतिशय युनिक आहे. 


सुदर्शन 


भगवान पेरुमल, सुंदर दिसणारा, सिंह, भगवान विष्णूचे एक शस्त्र, सुंदर अशा अर्थाचे हे सुंदर नाव आहे. सुदर्शन या नावाचा विचार तुम्ही तुमच्या मुलासाठी करु शकता.


शंखण्


शंखण् हे नाव रघुवंशातील नाव असून अतिशय युनिक आहे. या नावाचा नक्कीच विचार मुलाच्या नावाकरिता करु शकता. 


प्रवृद्ध


प्रवृद्ध हे नाव देखील अतिशय खास आहे. या नावाचा विचार तुमच्या मुलासाठी नक्कीच करु शकता. 


रघु 


रघु हे पराक्रमी राजा होते त्यामुळे या वंशाचे नाव रघुवंश असे म्हटले जाते. जर तुम्ही रामाचे भक्त असाल तर 'रघु' आणि 'रघुवंश' हे नाव देखील मुलासाठी देऊ शकता.