मुलांसाठी नाव निवडणं हा एक पालकांसमोरचा यक्ष प्रश्न आहे. यामध्ये पालकांना मुलांना असं नाव द्यायचं असतं, ज्यामध्ये एक विशेष अर्थ दडलेला असेल. कारण  मुलावर पहिला संस्कार होतो तो 'नामकरण विधी'चा. मुलासाठी नाव ही त्याची ओळख असते. या नावामधूनच तो स्वतःच अस्तित्व निर्माण करत असतो. अशावेळी युनिक आणि हटके तरीही आपल्या हिंदू धर्माच्या मुळाशी एकरुप असं नाव निवडायचं असेल तर पुढील नावांचा नक्की विचार करा. कारण या नावांमध्ये प्रभूश्रीराम आणि श्रीकृष्णाच्या नावाच्या कॉम्बिनेशनवरुन नावे तयार करण्यात आली आहे. 


मुलांसाठी युनिक नावे 


अशिना - इच्छा असा 'अशिना' या नावाचा अर्थ आहे. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची इच्छा असा याचा अर्थ आहे. 
अरिश - शांत, ज्ञानी असा या नावाचा अर्थ आहे. 'अरिश' हे नाव देखील तुम्ही मुलासाठी निवडू शकता. 
कृष्णा - दैवी शक्ती असं कृष्णा या नावाचा अर्थ आहे. 
रिशना - आशिर्वाद असा या नावाचा अर्थ आहे. प्रभूश्रीराम आणि श्रीकृष्ण या नावांमधून हे नाव तयार करण्यात आलं आहे. 
इशात - आनंद स्वरुप, आनंदाचा ठेवा असा 'इशात' या नावाचा अर्थ आहे. या नावात वेगळेपण दडलं आहे. 
अक्रित - अक्रित म्हणजे आकार, कला... या नावाचा अर्थ अतिशय खास आहे. कारण या नावात दडलाय महान व्यक्तीमत्त्वाचा आशिर्वाद. 
अनय - देवांचा राजा, अतिशय महत्त्वाचा असा या नावाचा अर्थ आहे. त्यामुळे 'अनय' या नावाची निवड कर केली जाते. 
अक्रित - अक्रित या नावाचा अर्थ देखील आकार. जीवनाला सुंदर आकार मिळावा असं वाटत असेल तर मुलासाठी निवडा हे खास नाव. 
शय - वर्तमान, परमेश्वराचं गिफ्ट... दोन अक्षरी असलेलं हे नाव अतिशय खास आहे. या नावाचा विचार नक्की करा.
अमस - अमस हे नाव देखील युनिक आहे. शुद्ध, परमेश्वराचं रुप, असा या नावाचा अर्थ आहे. 
अमल - आशा, अपेक्षा असं या नावाचा अर्थ आहे. अमल हे नाव मुलासाठी नक्कीच निवडू शकता.