Holi 2024 : रंगपंचमी म्हणजे रंगांची उधळण. मात्र या धुलवडीनंतर अनेकदा आपले चांगले कपडे रंगांनी खराब होतात. अशावेळी या सोप्या टिप्स तुमच्या कपड्याचे रंग अगदी सहज काढून टाकतील. एवढंच नव्हे तर कपड्याची पोत देखील चांगला राहिल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पांढऱ्या रंगाचे कपडे घालून धुलवड खेळण्याची मज्जाच काही और आहे. पांढऱ्या रंगाचे कपडे आणि त्यावर रंगांची वेगवेगळी छटा हाच रंगपंचमीचा खरा आनंद असतो. मात्र अनेकदा या पांढऱ्या रंगाच्या नादात आपण चांगली टीशर्ट, कुर्ता किंवा ड्रेस खराब करतो. ज्यानंतर प्रत्येकालाच वाईट वाटतं. रंगपंचमीच्या दिवशी आपल्या नातेवाईक, कुटुंब आणि मित्र परिवारासोबत हा सण साजरा केला जातो. या दिवशी एकमेकांवर गुलाल उधळला जातो. अशावेळी अनेकदा नवीन कपडे रंगांनी भरून जातात. तुमच्या देखील आवडत्या कपड्यासोबत असं होईल अशी भिती मनात येत असेल तर रंगपंचमीच्या पूर्वीच हे उपाय जाणून घ्या. 


लिंबू 


होळीच्या वेळी कपड्यांवरील लहान रंगाचे डाग काढण्यासाठी लिंबाचा रस वापरता येतो. यासाठी लिंबाचा रस काढून कपड्यांवर नीट लावा. काही वेळाने हे कपडे गरम पाण्याने धुवा, रंग बऱ्याच प्रमाणात बाहेर येतो. हट्टी रंग काढून टाकण्यासाठी लिंबू उपयुक्त ठरणार नाही, त्यामुळे यात आपला वेळ वाया घालवू नका.


दही


कपड्यांमधून होळीचे रंग काढण्यासाठी त्यावर घट्ट दही टाका आणि सुमारे 1 तास उन्हात सोडा. नंतर साबणाने घासून धुवा. तुम्हाला या उपायाचा एकाच वेळी इतका परिणाम दिसणार नाही. यासाठी 2 ते 3 वेळा वापरा.


व्हिनेगर


कपड्यांवरील डाग आणि रंग दूर करण्यासाठी व्हिनेगर देखील एक ठोस उपाय आहे. यासाठी कपड्यांवरील डाग असलेल्या भागात थोडेसे व्हिनेगर घाला आणि अर्धा तास पाण्यात सोडा, त्यानंतर ते धुवा. पण हो, हे लक्षात ठेवा की व्हिनेगर वापरणे केवळ कॉटनच्या कपड्यांवरच चालेल.


बेकिंग सोडा


डाग आणि रंग दूर करण्यासाठी बेकिंग सोडा हा एक अतिशय प्रभावी उपाय आहे. यासाठी एका बादलीत गरम पाण्यात थोडा बेकिंग सोडा टाका. नंतर त्यात रंगीत कपडे घालून एक किंवा दीड तास सोडा. यानंतर पाण्यातून कपडे काढून साबण आणि मलमलने स्वच्छ करा, रंग बाहेर येईल.