गालिचा किंवा कार्पेट किती दिवसांनी बदलावं, `या` 4 संकेतावरुन ओळखा
Home Care Tips in Marathi: घरात गालिचा किंवा रग घातल्यामुळे एक वेगळाच लूक येतो. पण हे गालिचे साफ करणे अतिशय किचकट असतात. तसेच एक गालिचा किती दिवस वापरायचा हे देखील समजून घेणे गरजेचे असते.
Home Decor Tips in Marathi: अनेकजण घर सुशोभित करण्यासाठी लिव्हिंग रुम किंवा बेडरुममध्ये गालिचा कार्पेटचा वापर करतात. याने फक्त घर सुंदर दिसतं असं नाही तर पायांना गारवाही कमी लागतो आणि आरामही मिळतो. हल्ली बाजारात गालिचा, कार्पेट वेगवेगळ्या रंगाचे आणि पॅटर्नचे असतात. अगदी 2 हजारापासून ते लाखांच्या घरात मिळणाऱ्या या गालिचाची विशेष काळजी घेणे गरजेची असते. पण गालिच्याचा लाईफस्पॅन किती आहे हे समजून घेणे ही तितकेच महत्त्वाचे असते. कारण गालिचामध्ये धुळ आणि घाण साचून रोगराई पसरण्याचाही प्रश्न निर्माण होतो.
अशावेळी पुढील चार संकेत तुम्हाला दर्शवतात की, गालिचा बदलण्याची किंवा धुण्याची वेळ झाली आहे.
साफ केल्यावरही येतो वास
तुम्ही तुमच्या खोलीतील गालिचा अनेक वेळा साफ केला आहे. परंतु असे असूनही, आपल्या कार्पेटमधून वास जात नाही. अशावेळी कार्पेट बदलणे अत्यंत गरजेचे आहे. कारण जर हा वास कार्पेटमध्ये असलेल्या आर्द्रतेमुळे आला असेल तर तो जाणे कठीण आहे. एवढेच नव्हे तर अशा कार्पेटवर जर लहान मुले खेळली तर त्यांना याचा नक्कीच त्रास होऊ शकतो.
स्वॉफ्टनेस होतो कमी
जसजसे कार्पेट जुने होत जाते तसतसे ते मऊपणा कमी होतो. त्यामुळे या गालिच्यावर चालताना पायांना आराम मिळत नाही. याचे कारण असे की, कार्पेटचा अधिक काळ वापर केल्याने, त्याखालील पॅडिंग सैल होते, आणि यावरुन पाय घसरण्याची दाट शक्यता असते. घरात लहान मुले किंवा ज्येष्ठ व्यक्ती असतील तर हे कार्पेट बदलणे अत्यंत गरजेचे आहे.
(हे पण वाचा - एक्सपायर झालेली औषधं फेकून न देता त्यांचा असा करा वापर; होईल फायदाच फायदा)
डाग होतात अधिक घट्ट
गालिचा स्वच्छ दिसला तरच चांगला दिसतो. मात्र गालिच्यावरील डाग अधिक गडद झाले असतील. तर ते दिसायलाही चांगले दिसत नाही. आणि अशा गालिच्यावर माशा घोंगावण्याचीही दाट शक्यता असते. त्यामुळे ते बदलून टाकावेत.
10 वर्षे जुने कार्पेट
कार्पेटची योग्य देखभाल केली तर ती दहा वर्षे सहज टिकते. परंतु जर कार्पेट 10 वर्षे जुने असेल तर ते बदला. कारण आता त्यामध्ये जंतू, धुळ असल्याची दाट शक्यता असते. त्यामुळे कार्पेट वेळोवेळी बदलणे आणि स्वच्छ करणे अत्यंत गरजेचे असते.