How do you take care of children In Marathi : तुमच्या कुटूंबात किंवा आजूबाजूला पाहिलं तर वर्षभराच्या आतील मुलं जमीनीवर खेळताना कधीच शांत दिसणार नाही. लहान मुलांना खेळताना हाताला जे येईल ते तोंडात टाकत असतात. मग कधी पेन, नाणं तर शेंगदाणे असा अनेक वस्तू असतात. कोणच्या नाकात शेंगदाणा गेला तर कोणी पैसे गिळले. तर कोणाच्या कानात हरभरा गेला, तर कोणी पाटीवरची पेन्सील व खोडरबरही गिळल्याचे प्रकार घडले आहेत. 'नजर हटी, दुर्घटना घटी,' अशी तरा पालकांच्या बाबतीत होती. पालकांच्या नजरा चुकवून मुलांचे उद्योग पालकांना चांगलेच तापदायक असल्याचे दिसून आले आहे. कधी कधी लहान मुलांच्या चुकूनही नाकात काही वस्तू टाकण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या जीवाला धोकाही होऊ शकतो. असा इशार तज्ज्ञांनी दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहान मुले काय खातील किंवा काय गिळतील याचा काही नेम नसतो. आई-वडीलांचे थोडेसे दुर्लक्ष झाले की खेळता खेळता मुले काहीतरी नाका-तोंडात घालतात. खिळा, नाणे, सेप्टी पिन, गिळाल्याची अनेक उदाहरणे शहरात घडली आहेत. मात्र स्कोपीच्या मदतीने गिळलेल्या वस्तू सहजपणे बाहेर काढणे आता शक्य झाल्याने डॉक्टर आणि पालकांची चिंताही काही अंशी कमी झाली आहे. कोणतीही शस्त्रक्रिया न करता वस्तू नाका-कानातून काढणे शक्य झाले आहे. 


अशी घ्या काळजी


तज्ज्ञांच्या मते, लहान मुलांच्या हाती नाणी, पिन, खिळा यांसारख्या वस्तू लागणार नाहीत, किंवा या वस्तू लहान मुले तोंडात टाकणार नाहीत याकडे बारकाईनें लक्ष देणे आवश्यक आहे. लहान मुलांनी काही जरी मिळाले तरी त्वरित डॉक्टरांकडे नेणे गरजेचे आहे. एखादी वस्तू पोटात गेली तर केळी, ब्रेड, भात खाऊ घातला जातो. अशामुळे ती वस्तू आणखी आत जाते आणि गुंतागुंत वाढते आणि रुग्णाला जास्त त्रासदायक ठरते. 


अत्याधुनिक दुर्बिणीचा वापर


 पोटात गेलेली वस्तू बाहेर काढण्यासाठी पूर्वी शस्त्रक्रिया केली जायची. मात्र आता अनेक अद्ययावत यंत्रे उपलब्ध झाली आहेत. परंतु यासाठीअनुभव आणि कौशल्य महत्त्वाचे आहे. शहरातील अनेक डॉक्टर एंडोस्कोपीच्या साहाय्याने गिळलेल्या वस्तू बाहेर काढतात. एका दवाखान्यात वर्षभरात पाच ते सहा प्रकरणे येतात असे तज्ज्ञांनी सांगितले. 


शेंगदाणा नाकात जाणे नित्याचे


शेंगडाणा नाकात गेला, असे प्रकार लहान मुलांमध्ये नित्यातेच असते. पाटीलवरील पेन्सिल गिळण्याचे प्रकार आधी खूप होते. खोडरबर गिळणाऱ्या मुलांचे प्रणाणही मोठे होते. एक रुपयाचे नाणेही  गिळणारी अनेक मुले नेहमीयच डॉक्टरांकडे टेतात. त्यामुळे पालक अधिक चिंतेत असल्याचे विविध ठिकाणी दिसून येत आहे.