Navratri 2024 Fasting: उद्यापासून नवरात्र सुरु होत आहे. नवरात्रीत नऊ दिवस उपवास धरला जातो. आपल्याकडे अनेक सणांना हमखास उपवास धरला जातो. या उपवासात साबुदाण्याची खिचडी आणि साबुदाण्यापासून बनवलेले पदार्थ आवर्जून खाल्ले जातात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, साबुदाणा कशापासून आणि कसा बनवला जातो? चला आज याबद्दलच जाणून घेऊयात. 


कशापासून बनवला जातो साबुदाणा? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साबुदाणा हा कोणत्याही धान्यापासून बनवला जात नाही. साबुदाणा हा साबुदाणा नावाच्या झाडाच्या देठाच्या लगद्यापासून बनवला जातो. साबुदाणाचे   झाड ताडाच्या झाडासारखे असते. या झाडाच्या देठाच्या  मधल्या भागाला मिक्सरमध्ये घालून करून त्याची पावडर बनवली जाते. ही पावडर गाळून चांगली गरम केल्यावरच त्यापासून साबुदाणा तयार होतो. 



हे ही वाचा: Navratri 2024: नवरात्रीचा उपवास करणार आहात? आधीच बनवून ठेवा उपवासाची भेळ, नोट करा Recipe


भारतात कसा बनतो साबुदाणा?


भारतात साबुदाणा टॅपिओका स्टार्चपासून बनवला जातो. हा स्टार्च बनवण्यासाठी कसावा नावाचा कंद वापरला जातो. कसावा हा दिसायला रताळ्यासारखाच असतो. या कंदाचा लगदा  बाहेर काढून मोठ्या भांड्यात 8 ते 10 दिवस ठेवला जातो. नंतर दररोज पाणी टाकले जाते. ही प्रक्रिया 4 ते 6 महिन्यांसाठी पुन्हा पुन्हा केली जाते. हा लगदा भांड्यातून काढून मशीनमध्ये टाकल्यावर साबुदाणा तयार होतो. मशिनमधून बाहेर येणारा साबुदाणा सुकवल्यानंतर त्यावर ग्लुकोज आणि स्टार्च पावडर टाकून त्याला पॉलिश केलं जाते. 


हे ही वाचा: Navaratri 2024: नवरात्रीमध्ये धान्य पेरण्याचा योग्य मार्ग माहितेय? 'ही' आयडिया करा फॉलो, १ दिवसात फुटू लागतील अंकुर


साबुदाणा खाण्याचे फायदे 


उपवासाच्या वेळी खाल्ला जाणारा साबुदाणा तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. साबुदाणामध्ये कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी यांसारखे पौष्टिक घटक चांगल्या प्रमाणात आढळतात. साबुदाणा खाल्ल्याने  हाडे/स्नायूंचे आरोग्य मजबूत होते.  योग्य प्रमाणात साबुदाणा खाल्ल्याने तुम्ही तुमच्या आतड्यांचे आरोग्य बऱ्यापैकी सुधारू शकते. वजन कमी करण्यासाठीही हा एक उत्तम पदार्थ आहे. 


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)