दिवाळीला नवीन झाडू खरेदी केलीय? पण आता घरभर भुसा होतोय? 4 ट्रिक्सने करा झाडू स्वच्छ
Diwali Special Trick : दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी केली जाते. लक्ष्मीपूजनच्या दिवशी झाडूची पूजा केली जाते. पण नवीन झाडू वापरताना त्यामधून पडणारा भुसा अतिशय त्रासदायक ठरतो. अशावेळी वापरा 4 ट्रिक्स.
धनत्रयोदशीला नवीन झाडू खरेदी करण्याची परंपरा आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या नव्या झाडूची पूजा केली जाते. झाडूला लक्ष्मीचा दर्जा देऊन तिची पूजा करतात. झाडूला हळद, कुंकू लावून पूजा केली जाते. यानंतर लक्ष्मीपूजन झाल्यावर घरातील कचरा या नव्याच झाडूने काढला जातो. याला अलक्ष्मी बाहेर काढणे असं म्हणतात.
दिवाळीनंतर ही झाडू वापरताना अनेकदा त्यामधून पडणारा भुसा त्रासदायक ठरतो. घरभर कचरा कमी आणि झाडूचा भुसाच जास्त असतो. अशावेळी अगदी सोप्या ट्रिक्सच्या मदतीने भुसा कमी करु शकतो.
नवीन झाडू वापरण्यापूर्वी तो प्लास्टिक पिशवीत असतो. त्याचवेळी तो थोडा झाडून घ्यावा. जेणेकरुन त्यामधील कचरा त्या पिशवीतच पडेल. झाडू पॅक असतानाच झाडून घेतला तर त्याचा भुसा बऱ्याच प्रमाणात कमी होतो.
नवीन झाडूवर खोबरेल तेलाचे दोन-तीन थेंब लावा आणि नंतर जुन्या जाड फणीने त्यातील सर्व धूळ किंवा पेंढा काढून टाका.
तसेच फरशीवर झाडू मारूनही कचरा साफ करता येतो. झाडूमधून सर्व कचरा सहज बाहेर पडेल आणि मग झाडू मारताना बाहेर येणार नाही आणि तुम्हालाही त्रास कमी होईल.
झाडूतून भुसा काढण्याचा हा हॅक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मग एक रुंद दात असलेला कंगवा घ्या आणि हळूहळू झाडूवर चालवा. यामुळे सर्व भुसा एकाच वेळी सहज गळून पडतात.
केर कधी काढावा
घरी केर काढताना सूर्यास्तानंतर किंवा ब्रम्ह मुहूर्तावर केर काढू नये असे देखील सांगितले जाते. कारण यामुळे घरात दोष निर्माण होतात.
तुटलेली आणि खराब झालेली झाडू कधीच वापरु नये. यामुळे घरात दोष निर्माण होतो.
झाडू जर तुम्हाला नवीन खरेदी करायची असेल तर मंगळवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवशी खरेदी करावी. अमावस्येच्या दिवशी झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते.