Tips To Clean Copper Utensils:  दिवाळीनिमित्त घराची साफसफाई केली जाते. दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजन केले जाते. यासाठी तांब्याच्या भांड्यांना विशेष महत्त्व असते. वर्षानुवर्षे ही भांडी वापरून काळी पडू लागतात. पण हीच तांब्याची भांडी तुम्हाला पुन्हा चमकदार बनवायची असतील तर ५ सोप्या ट्रिक्सचा वापर करू शकता. या सोप्या युक्त्या अवलंबून तुम्ही तुमच्या तांब्याच्या भांड्यांची हरवलेली चमक परत मिळवू शकता. या दिवाळीत नवीन भांडी घेण्याऐवजी जुनी भांडी पॉलिश करून पूजेत वापरा. चला या सोप्या ट्रिक्स जाणून घेऊयात. 


मीठ आणि व्हिनेगर


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    एक चमचा मीठ आणि एक कप व्हाईट व्हिनेगर मिक्स करून पेस्ट बनवा.

  • ही पेस्ट भांड्यावर मऊ कापडाने घासून नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.

  • तीन कप पाण्यात एक चमचा मीठ आणि अर्धा कप व्हिनेगर मिसळा आणि भांड्याला उकळलेल्या पाण्यात घाला. 



साबण किंवा डिटर्जंटची पेस्ट 


  • कोमट पाण्यात थोडासं साबण किंवा डिटर्जंट मिसळा.

  • या पेस्टमध्ये तांब्याची भांडी रात्रभर भिजवावीत आणि सकाळी मऊ ब्रशने स्वच्छ पाण्याने धुवा.


पांढरा व्हिनेगर


  • एक कप पाण्यात दोन चमचे व्हाईट व्हिनेगर मिसळा.

  • या मिश्रणात कापड बुडवून भांडे घासून घ्या. 

  • नंतर साबणाने धुवा आणि कोरडे करा.


शिजवलेली चिंच


  • थोडी चिंच पाण्यात भिजवावी.

  • या द्रावणाने भांडे घासून 5-7 मिनिटे सोडा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.


लिंबू आणि मीठ


  • लिंबू अर्धे कापून त्यावर मीठ शिंपडा.

  • कापलेल्या भागाने भांडी घासून घ्या.

  • दुसऱ्या पद्धतीने वापर करायचा असेल तर लिंबाचा रस, मीठ आणि बेकिंग सोडा मिक्स करून पेस्ट बनवा.

  • भांड्याला ही पेस्ट लावून घासा आणि साध्या पाण्याने धुवून टाका. 


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)