How to get rid of moths around lights: गावच्या ठिकाणी किंवा शहरापासून काहीसं दूर गेलं असता सहसा दिवेलागणीच्या वेळी जेव्हा बल्ब किंवा ट्युबलाईट सुरू केली जाते तेव्हा एक गोष्ट हमखास पाहायला मिळते. ही गोष्ट म्हणजे, या लाईटवर घोंगावणारे किटक, चतुर. अनेकदा तर, शहरातसुद्धा ट्युबलाईट असो किंवा बल्ब, किटकांचा थवाच पाहायला मिळतो. प्रकाशाभोवती घिरट्या घालणाऱ्या या किटकांना पाहून अनेकांना नकोसं होतं. काही मंडळी तर, किटकांच्या उच्छादाला वैतागून दारं- खिडक्या बंद ठेवू लागतात. याच किटकांना पळवून लावण्यासाठीचे काही उपाय तुम्हाला माहित आहेत का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अगदी लहानसे असणारे किटक तोंडात जाऊन कधी अडचणी निर्माण करतील काहीच सांगता येत नाही. त्यांची ही भुणभूण दूर करण्यासाठी स्वयंपाकघरातीलच काही गोष्टींचं मिश्रण फायद्याचं ठरेल. काय आहेत ते उपाय? पाहून घ्या... 


लसूण 


किटकांना पळवण्यासाठी लसूणाच्या पाकळीचा वापर करता येतो. यासाठी काही पाकळ्या घेऊन त्या बारीक करा. आता पाकळ्याचं मिश्रण पाण्यास मिसळून ते उकळून घ्या आणि थंड झाल्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये भरून जिथं किटक आहेत तिथं हा स्प्रे मारा. या उग्र वासानं किटक पळून जातील. 


कडुलिंबाचं तेल 


कडुलिंबाच्या तेला किटकनाशक गुणधर्म असतात. या तीव्र गंधामुळं किडे- किटत दूर राहण्यास मदत होते. हे मिश्रण तयार करण्यासाठी तेल आणि पाण्यात कडुलिंब मिसळा आणि हा स्प्रे दारं, खिडक्यांवर मारा. 


हेसुद्धा वाचा : महिनाभर भात न खाल्ल्यास शरीरावर कसा होतो परिणाम? पाहा... 


 


कापूर 


पुजाअर्चेसाठी वापरात असणारा कापूर तेलात किंवा पाण्यात मिसळून त्या स्प्रे ची फवारणी किटक असणाऱ्या भागात केल्यासही ते दूर पळून जातात. 


तुळस 


तुळशीची पानं पाण्यात उकळून त्यानंतर हे पाणी गाळून घ्यावं आणि हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरत हा स्प्रे दारं, खिडक्यांवर मारल्यास किटकांचं प्रमाण कमी होतं. 


(वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून, झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)