Urinary Tract Infection in Winter : हिवाळ्यात, मूत्रमार्गासंबंधी संक्रमण ही समस्या सामान्यपणे आढळून येते. हिवाळ्यातील थंड वातावरण संधिवात, हृदयासंबंधीत समस्या, श्वसनविषयक गुंतागुंत आणि त्वचेच्या समस्या यासारख्या समस्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. मूत्र प्रणालीमध्ये, प्रामुख्याने मूत्रपिंड, मूत्रमार्ग आणि मूत्राशयामध्ये होणाऱ्या जिवाणू संसर्गास मूत्रमार्गासंबंधीत संक्रमण (यूटीआय) म्हणतात. यूटीआयचा उपचार करण्याकडे दुर्लक्ष केल्यास जळजळ झाल्यामुळे मूत्रपिंड संक्रमण होऊ शकते. हिवाळ्यात, अतिरिक्त आर्द्रतेसह थंड हवामानामुळे युटीआयची शक्यता वाढते. हिवाळ्याच्या दिवसातही स्वत:ला पुरेशा प्रमाणात हायड्रेटेड ठेवणे, जरी तुम्हाला तहान लागत नसली तरीही पाण्याचे सेवन करणे हे मूत्रमार्गातील संक्रमण (UTIs) टाळण्यास मदत करु शकते.
 
नवी मुंबईतील कन्सल्टंट युरोलॉजिस्ट डॉ. विकास भिसे यांनी थंडीच्या दिवसात मूत्रमार्गाचे संक्रमण (UTIs) टाळण्यासाठी खास टिप्स दिल्या आहेत.


डॉक्टरांनी दिले महत्त्वाचे सल्ले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. हायड्रेटेड राहा
युटीआय संक्रमणामुळे वारंवार लघवीची भावना होणे, मूत्राशय पूर्णपणे रिकामे करण्यात अडचण येणे, लघवीला दुर्गंध येणे, फेसाळ किंवा गडद रंगाची लघवी आणि ताप अशी दिसू शकतात. शरीराच्या वजनानुसार आणि शरीराच्या क्रियाकलापांनुसार दररोज पुरेसे पाणी पिऊन हायड्रेटेड राहणे गरजेचे आहे. जरी थंड हवामानामुळे तुमच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तरी, यामुळे तुमचा युटीआय संक्रमणाचा धोका वाढू शकतो. भरपुर पाणी प्यायल्याने लघवीवाटे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढून टाकण्यास मदत होते आणि युटीआय संक्रमणास प्रतिबंध करते.


2. सुती अंतर्वस्त्र निवडा 
सुती अंतर्वस्त्राचा वापर करा कारण ते तुमचे मांडीचा भाग कोरडे ठेवण्यास मदत करतात. त्याठिकाणी जास्त ओलसरपणा जीवाणूंच्या वाढीसाठी योग्य वातावरण प्रदान करू शकतो. त्यामुळे तुमच्या त्वचेची कोमलता टिकविणाऱ्या कापडाची निवड करा. शक्य असल्यास झोपायच्या आधी असे दोनदा अंतर्वस्त्र बदला.


3. मासिक पाळीत महत्त्वाची काळजी
या दरम्यान सॅनिटरी नॅपकीन कोरडे ठेवा ते बदलण्याची प्रतीक्षा करू नका.


4. लघवीला रोखून धरु नका
मूत्राशयाच्या संसर्गाची शक्यता कमी करण्यासाठी तुम्हाला आवश्यक वाटेल तसे शौचालयाचा वापर करण्याचा प्रयत्न करा.


5. वैयक्तिक स्वच्छता राखणे आवश्यक 
प्रसाधनगृहाचा वापर केल्यानंतर, तुमचे खाजगी भाग पूर्णपणे स्वच्छ केल्याची खात्री करा, विशेषत: शौचास गेल्यानंतर, कारण सर्वात सामान्य जीवाणू ई कोली गुदद्वारामार्गे प्रवेश करतात.


6. क्रॅनबेरीचे सेवन करा
क्रॅनबेरी हे यूटीआयसाठी संसर्ग रोखण्यासाठी उत्तम उपायांपैकी एक आहे कारण त्यात प्रोअँथोसायनिडिन हे एक रासायनिक संयुग असते जे ई. कोलाय बॅक्टेरियाला मूत्राशयाच्या भिंतींवर चिकटण्यापासून प्रतिबंधित करते आणि संक्रमणाची शक्यता कमी करते.


7. मधुमेह नियंत्रित ठेवा
जर तुम्हाला मधुमेह असेल तर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवा कारण मधुमेह आणि युटीआय संक्रमणाचा परस्पर संबंध आहे.


8. कोणत्याही प्रकारच्या लघवीच्या तक्रारी किंवा सूचनांसाठी यूरोलॉजिस्टचा सल्ला घ्यायला विसरु नका.