Sugar for Glowing Soft Skin: स्किन केअरमध्ये स्क्रब फार महत्त्वाचे असते. त्वचेवर आलेल्या डेड स्किन अर्थात मृत पेशींना काढून टाकणे गरजेचे असते. यासाठी स्क्रबची प्रोसेस केली जाते. 
अनेकदा आपण फक्त आपल्या चेहऱ्याला स्क्रब करतो. पण चेहऱ्यासोबत  शरीराच्या इतर भागातून मृत पेशी काढून टाकणे तितकेच महत्त्वाचे असते. यामुळे त्वचा एक्सफोलिएट होते. मृत पेशी वेळोवेळी स्वच्छ न केल्यास त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू लागते. मृत त्वचेच्या पेशी काढून टाकून त्वचा मऊ करण्यासाठी स्क्रब करणे महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही साखर वापरू शकतो. साखरेपासून बनवलेले घरगुती स्क्रब उत्तम बॉडी एक्सफोलिएटर म्हणून काम करेल. यामुळे रक्ताभिसरण देखील सुधारेल. चला घरीच साखरेचे बॉडी स्क्रब कसा बनवायचा ते जाणून घेऊयात. 


लागणारे साहित्य 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कप साखर (बारीक किंवा खडबडीत, तुमच्या आवडीनुसार)
1/4 कप नारळ तेल
1/4 कप ऑलिव्ह ऑइल
तुमच्या आवडत्या आवश्यक इसेशियल काही थेंब (जसे की लैव्हेंडर, चंदन किंवा लिंबू)


जाणून घ्या कृती 


एका भांड्यात साखर घ्या.
त्यात खोबरेल तेल आणि ऑलिव्ह ऑईल मिक्स करा.
आता त्यात तुमच्या आवडीचे इसेशियल तेल घाला.
सर्व साहित्य चांगले मिसळा.
तयार स्क्रब हवाबंद डब्यात साठवा.


 स्क्रब कसे वापरावे?


आंघोळीनंतर किंवा ओल्या त्वचेवर या स्क्रबने हलक्या हाताने मसाज करा. काही मिनिटे मसाज केल्यानंतर कोमट पाण्याने धुवा. हे स्क्रब आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरता येतो.


(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)