Peanut Chikki Recipe: हिवाळ्यात आवर्जून खा शेंगदाणा-गुळाची चिक्की, झटपट तयार होणारी रेसिपी जाणून घ्या
Jaggery Peanut chikki : हिवाळ्यात शेंगदाणा-गुळाची चिक्की आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरते. घरची बाजारासारखी चिक्की कशी बनवायची ते जाणून घेऊयात.
हिवाळा आला की उब देणारे पदार्थ खाणे गरजेचे असतात. शेंगदाणा-गुळाची चिक्की हे प्रथिने, चरबी आणि कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्रोत आहे. हिवाळ्यात हे खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते, ज्यामुळे सर्दी-खोकल्यापासून तुमचा बचाव होतोच पण अति खाण्यावरही नियंत्रण होते. शेंगदाणा-गुळाची चिक्की बाजारात सहज उपलब्ध असते, पण जर तुम्ही ती घरीच तयार केली तर तिच्या शुद्धतेमुळे तुमच्या आरोग्याला कोणतीही हानी होणार नाही. चला शेंगदाणा-गुळाची चिक्की टपट तयार होणारी रेसिपी जाणून घेऊयात.
लागणारे साहित्य
250 ग्रॅम शेंगदाणे
200 ग्रॅम गूळ
25 ग्रॅम बटर
थोडे तूप (ग्रीसिंगसाठी)
कशी बनवायची चिक्की?
एका पॅनमध्ये मध्यम आचेवर शेंगदाणे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंतभाजून घ्या. हे लक्षात ठेवा की शेंगदाणे जास्त भाजू नकात, नाहीतर ते जळतील.
या शेंगदाण्याचे कव्हर काढून दोन भाग करून घ्या.
आता एका वेगळ्या पॅनमध्ये गूळ आणि १/२ कप पाणी घालून मध्यम आचेवर शिजवा. गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत आणि घट्ट होईपर्यंत शिजवा.
हे ही वाचा: Suji Mendu Vada Recipe: घरी बनवा झटपट मेदू वडा, रविवारचा नाश्ता होईल खास; जाणून रेसिपी
नंतर वितळलेल्या गुळात शेंगदाणे घालून चांगले मिक्स करावे. शेंगदाणे गुळाचा एक घट्ट मिश्रण होईपर्यंत शिजवा.
यानंतर ट्रे किंवा प्लेटला तूप लावून ग्रीस करा.
आता तयार मिश्रण ट्रेमध्ये पसरवा आणि बेलनाच्या मदतीने समान प्रमाणात पसरवा.
हे मिश्रण किमान २-३ तास थंड होऊ द्या. थंड झाल्यावर चिक्कीला हव्या त्या आकारात कापून घ्या.