Protein Hair Mask at Home: आपले केस कॅरोटीन नावाच्या प्रथिनापासून बनलेले असतात. या कॅरोटीनची उपस्थिती आपले केस निरोगी आणि मजबूत ठेवते. यामुळे केसांसाठी कॅरोटीन फार महत्त्वाचे आहे. याची काळजी घेणे गरजेचे आहे. तुमचे केस मजबूत तसेच चमकदार आणि रेशमी बनवायचे असतील तर तुम्ही घरी सहज प्रोटीन हेअर मास्क बनवू शकता. यासाठी बाहेरून काही आणायची गरज नाही. तुम्ही हा मास्क घरच्या घरी बनवू शकता. तांदूळ, मेथी आणि अंबाडीच्या दाण्यांनी बनवलेला हा प्रोटीन मास्क तुमचे केस मुळांपासून मजबूत करेल. हा प्रोटीन हेअर मास्क कसा बनवायचा ते जाणून घ्या. 


लागणारे साहित्य 


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    3 चमचे अंबाडीचे दाणे

  • अर्धा कप तांदूळ

  • 2 चमचे मेथी दाणे

  • 2 चमचे खोबरेल तेल


हे ही वाचा: Tricks To Peel Green Peas: मटार सोलायला त्रास होतोय? 'या' ट्रिक्सने काम होईल झटपट


 


कसा बनवायचा हेअर मास्क?


  • एका भांड्यात अंबाडी, तांदूळ आणि मेथी घ्या आणि त्यात अर्धा ग्लास पाणी घाला. हे मिश्रण मध्यम आचेवर ५ ते ७ मिनिटे उकळा. 

  • उकळी आल्यावर सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात ठेवा आणि एक ग्लास पाणी घालून बारीक करा. भांड्यात गुळगुळीत पेस्ट काढा. 

  • ही पेस्ट एका सुती कपड्यात टाकून ती चांगली पिळून घ्या. प्रोटीन पेस्ट पूर्णपणे बाहेर येईपर्यंत ते पिळून घ्या. 

  • आता या पेस्टमध्ये 2 चमचे खोबरेल तेल घाला. 


हे ही वाचा: 12 वर्षाच्या मुलीच्या बलात्काराचा बदला घेण्यासाठी कुवेतमधून बाप आला भारतात आणि...


 


कसा लावायचा हा हेअर मास्क?


हेअर मास्क बनवून लावल्यावर आता तुमच्या केसांचा मधला भाग करा.  हा प्रोटीन मास्क टाळूपासून लावायला सुरुवात करा. हा मास्क लावल्यानंतर 30 ते 40 मिनिटांनंतर केस फक्त पाण्याने धुवा. 


हे ही वाचा: लेडी डान्सरला स्टेज शोसाठी दुबईत बोलावले, 5-6 दिवस ओलीस ठेवले; आणि मग...


 


हेअर मास्क चा केसांना काय फायदे मिळतील?


या प्रोटीन मास्कचा नियमित वापर केल्यास केस फुटणे कमी होईल. तसेच नवीन केस वाढण्यास मदत होते.कोणत्याही प्रकारच्या केमिकल ट्रीटमेंटमुळे केस खराब झाल्यास जसे की कलरिंग, रिबॉन्डिंग, स्ट्रेटनिंग, एक्स्ट्रा इस्त्री, कलरिंग आणि बोर्डिंग इत्यादी, हे प्रोटीन केस ट्रीटमेंट महिन्यातून एक किंवा दोनदा करा. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल



(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)