साऊथ इंडियन फिल्टर कॉफीची टेस्ट इतर कॉफीच्या तुलनेत अतिशय वेगळी आहे. तसेच ही कॉफी जितकी प्याल तुम्ही तितकेच तिचे वेडे होता. अनेक  कॉफी लिव्हरला फिल्टर कॉफी मनापासून आवडतात. अनेकदा या कॉफीचे चाहते दिवसाला पाच ते सहा कप कॉफी पितात. वेगवेगळ्या कॉफी शॉपमधून ही कॉफी ऑर्डर केली जाते. 15 रुपयांपासून मिळणारी ही फिल्टर कॉफी अगदी 1000 च्या घरात ही मिळते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण तुम्हाला वाचून धक्का बसेल पण ही कॉफी तुम्ही घरच्या घरी तयार करु शकता. अतिशय पारंपरिक पद्धतीने मिळणारी ही इंडियन फिल्टर कॉफी तुम्ही घरी अतिशय सोप्या पद्धतीने बनवू शकता. 


कशी तयार कराल ही कॉफी


फिल्टर कॉफी बनवण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. 
यामध्ये काही मीडियम आकाराचे कॉफी बिन्स पाण्यात टाकून उकळले जातात. 
ही रेसिपी तयार करताना काही विशिष्ट गोष्टी लक्षात घेतल्या जातात. 
फिल्टर कॉफी बनवण्यासाठी सर्वात अगोदर दूध उकळले जाते. 
त्यानंतर त्यामध्ये साखर घालून ते उकळलं जातं. 
त्यानंतर पॅनमध्ये एक कप पानी आणि थोडी कॉफी बिन्स टाकले जाते. 
यानंतर दुध गाळून घेतले जाते 
त्यामध्ये ही फिल्टर कॉफी स्टीलमध्ये गाळून घेतली जाते. 


या गोष्टी लक्षात ठेवा 


साऊथ इंडियन फिल्टर कॉफी जास्त उकळायची नसते. तसेच ती करपवू नये. तसेच या कॉफीमध्ये सर्वात जास्त साकरही घालू नये. तसेच कॉफी बिन्स जास्त ठवळावी लागत नाही. यामध्ये कॉफी बिन्स उकळायचे असतात. ज्यामुळे सर्वात जास्त चांगली कॉफी तयार करु शकता. 


फिल्टर कॉफीचे फायदे 


साऊथ इंडियन फिल्टर कॉफी ही मेटाबोलिज्म वाढवण्यास मदत करते. तसेच भूक कंट्रोल करण्यास मदत करते. तसेच गोड खाण्याची क्रेविंग देखील दूर होते. वेट लॉस करण्यासाठी फिल्टर कॉफी उत्तम पर्याय आहे. रोज रोज तीच चहा आणि कॉफी पिऊन कंटाळा आला असेल तर फिल्टर कॉफी हा उत्तम पर्याय ठरु शकतो. साऊथ इंडियन कॉफी ट्राय करा.