Mendu Vada Recipe: दक्षिण भारतीय पदार्थ सगळ्याच भारतीयांना आवडतात. नाश्त्यासाठी (Breakfast Recipe) आवर्जून डोसा, उत्तपा, मेदू वडा असे पदार्थ खाल्ले जातात. मेंदू वडा हा अनेकांचा आवडीचा पदार्थ आहे. हा वडा तांदूळ आणि उडीद डाळीपासून बनवला जात असला तरी तो बनवण्याची प्रक्रियाही थोडी लांब असते. पण आज आम्ही तुम्हाला रव्यापासून मेदू वडा बनवण्याची रेसिपी (Easy Breakfast Recipe)  सांगणार आहोत. जे खायला खूप कुरकुरीत आहे आणि चवीला पण टेस्टी लागतील. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेहे वडे बनवणे खूप सोपे आहे. मोठ्यांसोबतच मुलांनाही मेदू वडे खायला आवडतील. चला तर मग जाणून घेऊया मेदू वड्याची झटपट तयार करता येईल अशी सोपी रेसिपी जाणून घेऊयात. 


लागणारे साहित्य 


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    1 कप रवा 

  • 1/2 टीस्पून बेकिंग सोडा

  • 1/4 टीस्पून बडीशेप

  • 1/4 टीस्पून जिरे

  • 1/4 टीस्पून काळी मिरी (क्रश करून) 

  • १/४ टीस्पून आले-हिरवी मिरची पेस्ट

  • चवीनुसार मीठ

  • रेड चिली फ्लेक्‍स  (पर्यायी)

  • कढीपत्ता

  • 2 चमचे कोथिंबीर (बारीक चिरून)

  • तळण्यासाठी तेल


हे ही वाचा: सर्दी-खोकला झालाय? तुळशीचा चहा देईल आराम; जाणून घ्या सोपी रेसिपी


जाणून घ्या कृती 


  • सर्व प्रथम कढईत तेल गरम करा. त्यात जिरे,काळी मिरी घालून छान तडतडू द्या. मसाले तडतडायला लागल्यावर त्यात दोन वाट्या पाणी घाला.

  • आता त्यात कोथिंबीर, कढीपत्ता, रेड चिली फ्लेक्‍स आणि मीठ घाला.

  • पाण्याला उकळी आली की त्यात रवा घाला. बेकिंग सोडा किंवा इनो देखील घाला. रवा पाणी शोषून घेईपर्यंत छान शिजवा.

  • आता कढई झाकून ठेवा आणि मिश्रण थोडं थंड होऊ द्या.

  • थंड झाल्यावर मिश्रण पिठासारखे मळून घ्या. यानंतर मेदू वड्याला छान आकार द्या.

  • कढईत तेल गरम करून वडे कुरकुरीत सोनेरी होईपर्यंत तळा.

  • आता मेदू वडा चटणी किंवा सांबारसोबत सर्व्ह करा.