`या` 6 पद्धतीने डोळ्याखालील डार्क सर्कलचा करा कायमचा बंदोबस्त..
Dark Circle Removing Tips: डोळ्याखाली येणाऱ्या काळ्या वर्तुळांमुळं कधी कधी खूप विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागतो. अशावेळी हे घरगुती उपाय करुन पाहा.
Dark Circle Removing Tips: डोळ्याखाली येणाऱ्या काळ्या वर्तुळामुळं सौंदर्यात बाधा येते. डार्क सर्कलमागे अनेक कारणे आहेत. वृद्धत्व, जेनेटिक्स,खाण्या-पिण्याच्या वाईट सवयी , एखादी मेडिकल कंडिशन किंवा चुकीचे स्किन केअर प्रोडक्ट यामुळं डोळ्याखालील काळे वर्तुळ येतात. अनेकदा तर डोळ्याखालची काळी वर्तुळ खुप जास्त उठून दिसतात. मेकअपच्या सहाय्याने हे डार्क सर्कल लपवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, सतत मेकअप केल्यानेही त्वचा खराब होऊ शकते. अशावेळी या डार्क सर्कलपासून सुटका मिळवण्यासाठी काही घरगुती उपायांचा वापर तुम्ही करु सकता. घरातीलच हे पदार्थ वापरुन तुम्ही डार्क सर्कल कमी करु शकता.
डार्क सर्कल घालवण्याचे घरगुती उपाय जाणून घ्या!
काकडीचा रस
काकडीच्या रसात अँटी ऑक्सीडेंट्स हे गुणधर्म असतात. काकडीमुळं त्वचेला व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि अँटी इंफ्लेमेटरी गुण मिळतात. जे त्वचेसाठी फायदेशीर आहे. तुम्ही काकडीचे गोल काप करुन डोळ्यांवर ठेवू शकता. किंवा काकडीचा रस कापसाच्या सहाय्याने डोळ्यांखाली लावू शकता. 10 ते 20 मिनिटे हा रस डोळ्यांखाली ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
बदामाचे तेल
व्हिटॅमिन ईने युक्त असलेले बदाम तेल डोळ्यांखाली लावल्याने डार्क सर्कल कमी होऊ शकतात. रात्री झोपण्याच्या पूर्वी डार्क सर्कलवर बदाम तेल लावून ठेवा आणि सकाळी चेहरा धुवून टाका.
बटाटा
बटाट्यात ब्लिचिंगचे गुण असतात. बटाट्याच्या रसात त्वचेला व्हिटॅमिन ए,व्हिटॅमिन सी आणि फायदेशीर अंजाइम्स मिळतात. बटाट्याचा रस डोळ्यांखाली लावून 10 ते 15 मिनिटे तसाच ठेवून द्या नंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या.दिवसातून दोनदा बटाट्याचा रस लावाल्यास डार्क सर्कल कमी होतील.
टॉमेटोः
लाल टॉमेटोमध्येही ब्लिटिंगचे गुण असतात. यात अँटी ऑक्सीडेंट लाइकोपीन आहे. जे डार्क सर्कल कमी करतात. यात व्हिटॅमिन ए, बी आणि सीसोबतच सल्फर आणि कॅल्शियम सारखे खनिजे असतात जे डार्क सर्कल कमी करतात. डार्क सर्कलवर 10 मिनिटे टॉमेटोचा रस लावल्याने डार्क सर्कल कमी होतात.
थंड दूध
डार्क सर्कल कमी करण्यासाठी थंड दूध हा सुद्धा बेस्ट उपाय आहे. दूधातील गुणधर्म एक चांगलं क्लिंजर म्हणून काम करतात. दुधात कापूस भिजवून डार्क सर्कलवर 15 मिनिटे लावून ठेवा आणि नंतर चेहरा धुवून टाक.
कोरफडीचे जेल
डार्क सर्कल कमी करण्यासाठी अँटी इंफ्लेमेटरी गुणाने पूर्ण असेलेल कोरफडीचे जेलदेखील तुम्ही लावू शकता. यामुळं स्किनला सूदिंग इफेक्ट्सदेखील मिळतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.