Perfume Side effects: सकाळी घरातून बाहेर जाताना, प्रेयसीसोबत डेटवर जाताना असो किंवा एखाद्या छान कार्यक्रमाला जाताना कितीही छान तयार झालं तरी शरीरावर परफ्युम मारल्याशिवाय ती तयारीदेखील अपू्र्ण राहते. परफ्युमच्या सुगंधामुळं ताजंतवानं वाटतं. अलीकडेच बाजारात चार-पाच हजारांपर्यंतचे महागडे परफ्युमही आले आहेत. पण तुम्हाला माहितीये का जो परफ्युम तुम्ही दिवसरात्र वापरता त्यातील केमिकलमुळं तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परफ्युममध्ये असलेले केमिकल तुमच्या आरोग्यासाठी खतरनाक असू शकते. यामुळं परफ्युम पुरुषांच्या टेस्टोस्टेरोन हार्मोन्सवर विपरीत परिणाम होऊ शकतो. यावर्षी जुन महिन्यात एक संशोधन करण्यात आलं होते. या संशोधनानुसार, परफ्युम, एअर फ्रेशनेस आणि डिटर्जेंटमध्ये असलेले फ्थेलेट्स रसायन महिलांमध्येही हार्मोलन असंतुलन निर्माण करु शकते. 


अमेरिकेतील शिकागोमध्ये ENDO 2023 मध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, फ्थेलेट्स टेस्टोस्टेरोन हार्मोन्सचे संतुलन बिघडवू शकते. त्यामुळं पुरुषांच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर, यात अनेक सिंथेटिक वस्तू सापडल्या आहेत. दिल्ली सफदरजंग हॉस्पिटलचे वरिष्ठ निवासी डॉक्टर दीपक कुमार सुमन सांगतात की शरीरात फॅथलेट्सचे रसायन वाढले तर वंध्यत्वाचा धोका वाढू शकतो. पण याबद्दल बरेच संशोधन केले जात आहे. त्यामुळे कोणत्याही निष्कर्षावर येणे घाईचे आहे.


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या रसायनाचा संपर्क त्वचेसोबत झाल्यास तुम्हाला जळजळ जाणवते. काही रसायने इतके घातक असतात की त्यामुळं त्वचेवर व्रण आणि कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात.  फ्थेलेट्सचा वापर साधारणतः कोलोन, दुर्गंधीनाशक आणि शॅम्पूसह अनेक गोष्टींमध्ये सुगंध निर्माण करण्यासाठी केला जातो. परंतु व्यापाराच्या गुप्त संरक्षणामुळे, सुगंधाचे घटक अनेकदा सूचीबद्ध केले जात नाहीत, ज्यामुळे लोकांना कोणत्या उत्पादनांमध्ये phthalates आहेत हे जाणून घेणे अधिक कठीण होते. phthalates च्या वापरावर अनेक देशांनी बंदी घातली आहे. 


आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, फ्थेलेट्स मुळे मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि प्रजनन क्षमता यांच्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. परंतु टेस्टोस्टेरॉन हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांबाबत फ्थेलेट्सच्या एक्सपोजरला जोडणारे बरेच पुरावे आहेत, परंतु आरोग्यावर होणारे त्याचे दीर्घकालीन प्रभाव अद्यापही अभ्यासले जात आहेत.