साखर, भारतीय पाककलेल्या परंपरांचा एक अविभाज्य भाग असणारा हा पदार्थ आपल्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांची एक अशी खास कहाणी रचतो जिचे पडसाद भारतीय रीतिरिवाजांच्या वैविध्यपूर्ण पटावर उमटत राहतात. लग्नसराईतील भव्य सोहळ्यांपासून ते सणासुदीच्या रंगबिरंगी उत्सवांपर्यंत प्रत्येक ठिकाणी साखरेची भूमिका मध्यवर्ती असते, जी उल्हास, भरभराट आणि आनंदाच्या सामुदायिक भावनेची प्रतीक असते. एकेकाळी केवळ उच्चभ्रू वर्गांसाठी राखीव असणारी उंची गोष्ट म्हणून नावाजली गेलेल्या साखरेच्या दुर्लभतेमुळे आणि श्रीमंतीशी जोडलेल्या नात्यामुळे सांस्कृतिक नात्यामुळे तिचे सांस्कृतिक महत्त्व अधिकच वधारले, व पाहता पाहता भारतीय समाजामध्ये ती भरभराट आणि यशाचे प्रतीक बनली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय पाकशास्त्रामध्ये कणीदार साखर आणि गुळापासून ते पाल्म शुगरपर्यंत साखरेच्या कितीतरी प्रकारांचा समावेश आहे आणि यातील प्रत्येक प्रकार विविध पाककृतींना त्याचा अनोखा स्वाद मिळवून देतात. स्वादिष्ट मिठाया आणि मिष्टान्नांना गोडवा पुरविण्यामध्येच नव्हे तर तिखट पदार्थांच्या गटात मोडणार्या भारतीय पाककृतींमध्ये वापरल्या जाणारे विविध मसाले आणि विविध स्वाद यांच्यामध्ये एक सुरेख संतुलन साधण्यामध्ये साखरेची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. मसाला चहाच्या वाफाळत्या कपातून येणारा मनमोहक दरवळ असो किंवा पारंपरिक मिठाया बनविण्याच्या कलेमध्ये वापरली जाणारी नाजूक कारागिरी असो, मन आनंदून टाकणार्या अशा असंख्य पाककृतींची चव आणि त्यांचा रसानुभव यांच्यामध्ये साखरेने नेहमी भरच टाकली आहे.  


भारतीय रीतिरिवाजांचा अविभाज्य घटक बनलेल्या आणि इथल्या परंपरा आणि सणसोहळ्यांमध्ये सहज सामावलेल्या साखरेचे सांस्कृतिक महत्त्व काळानुसार वाढत गेले आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक सणांसाठी मिळणार्या सुट्ट्यांमध्ये मेजावर सजणार्या पारंपरिक मिठायांच्या पाककृतींचे साखरेशिवाय पानही हलत नाही. भारतामध्ये अशा सुट्ट्या म्हणजे सार्या कुटुंबाने एकत्र जमण्याचा काळ असतो आणि मिष्टान्ने हा सर्वांना एकत्र आणणारा एक महत्त्वाचा घटक आहे. शिवाय भारत हा विविध भाषा, धर्म आणि रीतीरिवाजांचा देश आहे आणि प्रत्येक धर्माची स्वत:ची खास मिष्टान्ने आहेत, म्हणजे या मिष्टांन्नांमध्ये भारतीय संस्कृतीच्या विविधतेचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं असं म्हटल्यास वावगं ठरू नये. 


मिष्टान्नाचा आस्वाद घेण्याच्या निमित्ताने एकत्वाच्या भावना जागी होते. भारतामध्ये सुट्ट्या म्हणजे सार्या कुटुंबाने एकत्र जमण्याचा काळ असतो आणि मिष्टान्ने हा सर्वांना एकत्र आणणारा एक महत्त्वाचा घटक आहे. या काळात विविध पाककृतींची देवाणघेवाण होते, गोड पदार्थ बनविण्याच्या निरनिराळ्या पद्धती शोधल्या जातात आणि मिठायांच्या या गोड भेटींची देवाणघेवाण केली जाते. शिवाय भारत हा विविध भाषा, धर्म आणि रीतीरिवाजांचा देश आहे आणि प्रत्येक धर्माची स्वत:ची खास मिष्टान्ने आहेत, म्हणजे या मिष्टांन्नांमध्ये भारतीय संस्कृतीच्या विविधतेचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. गोड पदार्थ भारतीय पाककलेच्या श्रीमंत आणि वैविध्यपूर्ण इतिहासाची खूण सांगतात, मग तो बंगाली रसगुल्ला असो किंवा उत्तर भारताची जिलेबी असो, महाराष्ट्राचा गुलाबजाम असो किंवा दक्षिणेकडचा म्हैसूर पाक असो. तोंडाला पाणी आणणारी ही पक्क्वान्ने म्हणजे आपल्यासाठी फक्त खाद्य रूपाच्या पार जातात, आनंदाच्या भावनेच्या एकमेकांत गुंतलेल्या धाग्यांचे, आणि आनंदाच्या या प्रसंगांशी नाजूकपणे जोडलेल्या, मनाच्या कुपीत जपून ठेवलेल्या नात्यांचे प्रतिनिधीत्व करतात. 


साखरेने पाककलेच्या परंपरेतील आपल्या भूमिकेच्या पलीकडे जात भारतीय संस्कृतीमधील आदरातिथ्य, उदारता आणि दुसर्याला देण्यातील आनंद या मूल्यांशी एक गहिरे नाते जपले आहे. लग्नसोहळ्यांमध्ये मुक्तहस्ते वाटल्या जाणार्या मिठाईमधून हे नाते अभिव्यक्त होते, जिथे नात्यातील गोडवा आणि उबदारपणा यांचे प्रतीक असलेल्या मिठाईने प्रत्येक पाहुण्याचे स्वागत होते. इतकेच नव्हे तर धार्मिक सणवारांमध्ये साखर हे भक्तीचे प्रतीक बनून जाते, समर्पण आणि उदारतेच्या मूलतत्वाचे प्रतिनिधीत्व करते. 


भारताने परदेशी प्रभावांना आणि सांस्कृतिक देवाणघेवाणींसाठी आपली दारे उघडली तशा इथल्या पाककलेच्या पटावर विविध स्वाद आणि पाककलेल्या पद्धतींचा एक आनंददायी संगम झाला. भारतीय पाककलेमध्ये पाश्चात्य मिष्टान्ने आणि बेक्ड पदार्थांनी प्रवेश केला आणि साखरेच्या वापराचे व महत्त्वाचे क्षितिज अधिकच विस्तारले. पारंपरिक मिठाईवाल्यांनीही हे प्रभाव आपलेसे केले आणि आपल्या पारंपरिक पद्धतीने बनविल्या जाणार्या मिठायांमध्ये चॉकलेट आणि इतर पाश्चात्य घटक अगदी कसबीपणे समाविष्ट केले. दोन स्वादांचा हा नव्यानेच झालेला संगम देशभरातील लोकांच्या रसनेला आनंदित करून गेला, दोन जगांमधील जे जे उत्तम त्या त्या सगळ्याचा मेळ साधणारी फ्युजन स्वीट्स चाखण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनामध्ये जागृत झाली. 


आज, अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण मिष्टान्नांना चाखण्याची लोक आतुरतेने वाट पाहत असतात, विकेंन्डच्या चवीढवीच्या खाण्यामध्ये, खास प्रसंगांना हे पदार्थ अगदी केंद्रस्थानी दिसू लागले आहेत. आरोग्याविषयीची जागरुकता वाढत असताना आणि साखरेच्या अतिरिक्त चिंताही वाढत असताना साखरेच्या सांस्कृतिक स्थानामध्येही बदल झाला आहे. आधुनिकता आणि संतुलन यांच्या महत्त्वावर भर देताना पारंपरिक भारतीय मिठाया आणि मिष्टान्नांच्या मूळ चवीला धक्का बसू देणार नाही असे पर्यायी स्वीटनर्स व अधिक आरोग्यदायी पर्यायांचा शोध अधिकाधिक प्रमाणात घेतला जात आहे. या बदलांमुळे साखरेशी संबंधित स्वाद आणि सांस्कृतिक वारसा कायम राहण्याची हमी मिळते आणि हे करताना आरोग्याविषयी जागरुक असलेल्या समाजाच्या बदलत्या गरजा आणि प्राधान्यक्रमही स्वीकारले जातात.


काहीही असले तरीही साखर हा भारताच्या पाकसंस्कृतीच्या हृदयस्थानी खोलवर रुजलेला विषय आहे, ज्याचे सांस्कृतिक महत्त्व अजूनही तसेच आहे. साखर हे गोडवा, उबदारपणा, देण्यातील आनंद आणि उत्सवी भावनेचे प्रतीक आहे. सर्वोच्च दर्जाची स्वच्छता आणि दर्जा यांची खात्री देणारी पॅकेज्ड साखर सुट्ट्या साखरेपेक्षा वरचढ ठरली आहे. पॅकेज्ड साखर स्वच्छतेच्या निकषांच्या कठोरतम अटीही पूर्ण करतेच, पण त्याचबरोबर सुलभता, अचूक मोजमाप यांची हमी देत पाककलेचा आणि भोजनाचा जास्तीत जास्त चांगला अनुभव मिळवून देण्याची हमी देते.


भारतीय पाकसंस्कृतीमधील साखरेचे महत्त्व म्हणजे आनंद, भरभराट आणि एकत्रितपणा यांच्या मर्म साजरे करणारी एक सुमधूर सुरावट आहे. भारतीय रीतिरिवाजांच्या उंची गालिचाचे धागे एकमेकांत गुंफणारी साखर पिढ्यांपिढ्यांपासून चालत आलेला स्वादाने परिपूर्ण वारसा दर्शविते. पारंपरिक पदार्थांना नाविन्याची झालर चढवित ती सांस्कृतिक सीमा मिटविते. एखाद्या पारंपरिक मिठाईचा स्वाद घेणे असो वा फ्युजन शैलीतील मिष्टान्नांची लज्जत अनुभवणे असो, साखर नेहमीच शुद्ध आनंदाच्या क्षणांना आमंत्रण देते, तिचा मनापासून आस्वाद घेणार्यांच्या जिभेवर हृदयामध्ये आपला गोडवा पसरवते, ही माहिती रवी गुप्ता, कार्यकारी संचालक, श्री रेणुका शुगर्स लि. यांनी शेअर केली आहे.