मुलांची 8 नावे ज्यामध्ये आहे श्री रामाचा उच्चार
Indian Baby Boy Names on Lord Ram : मुलांची नावे ठेवताना अनेकदा प्रभूरामाच्या नावावरुन ठेवण्याचा विचार करतात. त्यांच्यासाठी हे 8 अनोखे पर्याय.
8 Boys Name on Lord : श्रीप्रभू रामावर अनेकजण निस्सिम भक्ती करत असतात. आपल्या मुलांना प्रभू रामाच्या नावावरुन नावे द्यावेत असा विचार असतो. त्यांच्यासाठी हे अनोखे 8 पर्याय. महत्त्वाचं म्हणजे या नावांमध्ये रामाचा उल्लेख आणि उच्चर आहे. पालक जर मुलासाठी नावाचा विचार करत असाल तर हा पर्याय नक्कीच चांगला राहिल या शंका नाही. या नावाचा अर्थ देखील जाणून घ्या.
संग्राम
संग्राम या नावात शेवटी 'राम' या शब्दाचा उच्चार आहे. 'संग्राम' या नावाचा अर्थ आहे 'एक प्रकारची क्रांती.'
रमन
सुरुवातीला 'राम' या शब्दाचा उच्चार 'रमन' या नावात आहे. रमण हे हिंदू मुलाचे नाव आहे आणि हे अनेक अर्थ असलेले हिंदी मूळ नाव आहे. रमण या नावाचा अर्थ प्रिय; सुखकारक; कामदेव रमण नावाचा अर्थ अतिशय खास आहे.
विक्रम
विक्रम नावाचा अर्थ देखील खास आहे. विक्रम या नावातही 'राम' या शब्दाचा उच्चार आहे. शौर्य; शौर्याचा सूर्य; भगवान हनुमान; कौतुकास्पद असा या नावाचा अर्थ आहे.
रघुराम
रघुराम या नावातच 'राम' आहे. रघुराम हे हिंदू मुलाचे नाव आहे आणि हे अनेक अर्थ असलेले हिंदी मूळ नाव आहे. रघुराम नावाचा मराठीत अर्थ भगवान राम असा होतो.
सियाराम
'सियाराम' या नावातही राम या शब्दाचा उल्लेख आणि उच्चर दोन्ही आहे. सियाराम म्हणजे सितेचे पती राम आणि या नावाचा अर्थ देखील राम असा आहे.
रमित
रमित हे हिंदू मुलाचे नाव आहे आणि हे अनेक अर्थ असलेले हिंदी मूळ नाव आहे. रमित नावाचा मराठीत अर्थ आवडले. रमित नावातच 'राम' नावाचा उल्लेख आहे.
रामम
रामम या नावातच 'राम' नावाचा उच्चार आहे. तुम्ही देखील हे नाव मुलाला देवू शकता. तीन अक्षरी असं हे वेगळं नाव आहे.
रामोजी
रामोजी या नावातच सुरुवातीला 'राम' हे नाव आहे. या नावाचा विचार नक्कीच करु शकता.