इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी त्यांच्या चार महिन्यांच्या नातू एकाग्र रोहन मूर्तीला अब्जाधीश बनवले आहे. त्यांनी आपल्या नातवाला कंपनीचे 240 कोटींहून अधिक किमतीचे शेअर्स भेट दिले आहेत. यामुळे, 'एकाग्र' ही या अनुभवी आयटी कंपनीतील सर्वात तरुण भागिधारक बनला आहे. या शेअर हस्तांतरणामुळे 'एकाग्र' हा देशातील सर्वात तरुण लक्षाधीश बनला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नारायण मूर्ती यांच्या या घोषणेनंतर सगळीकडे आजोबा आणि नातव्याच्या नात्याची चर्चा होत आहे. आजोबा आणि नातवाचं नातं हे कायमच खास असतं. नातवामध्ये कायमच आजोबा स्वतःचं बालपण शोधत असतो. आपलं कुटुंब , नावं पुढे नेणारा म्हणून पाहिलं जातं. आजोबांच नातवावर विशेष प्रेम असतं. 
आजोबांची संपत्तीच नाही तर आणखी 4 गोष्टी नातू शिकत असतो. त्या कोणत्या ते जाणून घेऊया. 


'एकाग्र' या नावाचा अर्थ 


सुधा मूर्ती आणि नारायण मूर्ती यांच्या मुलाचे नाव एकाग्र रोहित मूर्ती. एकाग्र हे नाव महाभारतातील अर्जुनच्या पात्रावरून प्रेरित असल्याचे सांगितले जात आहे. 'एकाग्र' हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ अटूट लक्ष आणि दृढनिश्चय. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांनी आपल्या नातवाला दिलेलं नाव अतिशय विशेष आहे. 


परंपरा 


आजोबा-नातू हे नातं कायमच खास असतं. आजोबा नातवाचं संगोपन करण्यात बराच वेळ घालवतात किंवा ही गोष्ट करायला त्यांना आवडतं. नातवासोबत निवांत वेळ घालवत असताना आजोबा त्याला कळत नकळत अनेक संस्कार करत असतात. कारण आजोबांची सांस्कृतिक परंपरा नातूच पुढे नेणार असतं. 


संस्कार


प्रत्येक घराचे काही संस्कार असतात. हे संस्कार आजोबा नातवामध्ये रुजवण्यास खास प्रयत्न करत असतात. अनेकदा आजोबांसाठी नातवंड हे दुधावरची साय असते. कारण आजोबा मुलांना प्रथा, संस्कृती शिकवतात. अनेक सण वर मुलं आजी-आजोबांकडून शिकतात. यामुळे देवासमोर उभं राहून शुभं करोती म्हणणे किंवा प्रेम, भाव शिकतात. 


कौतुक


आजोबांनी केलेलं कौतुक हे नातवंडासाठी कायमच खास असतं. तसेच आजोबांनाही नातवंडांचे कौतुक करायला विशेष आवडतं. तसेच नातवंडांमधील कलागुण सगळ्यांसमोर अधोरेखित करायला ही आजोबांना आवडतं. यामुळे कायमच नातवंडांचे देखील विशेष प्रेम हे आजोबांवर असतं. 


हक्काची व्यक्ती 


आजोबांना कायमच नातवंड हक्काचे समजतात. त्यामुळे त्यांच्यासोबत असताना नातवंडांचा कोणताही आड पडदा नसतो. अशावेळी नातवंडं देखील आजी-आजोबांशी घट्ट नातं निर्माण करु शकतात. महत्त्वाचं म्हणजे हे नातं कायम असंच टिकून राहतं. त्यामुळे नातवंडांना आजोबा आपल्या हक्काचे वाटतात.