'आंतरराष्ट्रीय महिला दिन' आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च रोजी साजरा करतो. या विशेष दिवशी विविध क्षेत्रातील महिलांच्या योगदानाची आठवण केली जाते. महिलांशी संबंधित विषय समस्यांवर लक्ष दिले जाते आणि त्यावर काम करणे आणि त्यांच्याबद्दल त्यांचे हक्कांबद्दल बोलणे हे 'महिला दिन' साजरा करणे मागचे उद्देश असतो. दरवर्षी 'महिला दिना'साठी एक थीम निवडली जाते आणि ती साध्य करण्यासाठी प्रयत्न देखील केले जातात 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' देशभरात वेगवेगळ्या स्वरूपामध्ये साजरा केला जात असतो. कार्यालयांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये तर शैक्षणिक संस्थांमध्ये, शाळांमध्ये सर्व कार्यालयांमध्ये, भाषण वादविवाद अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. तुम्ही देखील एखाद्या कार्यक्रमासाठी भाषणाची तयारी करत असाल तर त्यासाठी अत्यंत सोप्या पद्धतीने भाषण करण्यासाठी हे दोन नमुने नक्की पाहा. 


नमुना - 1


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे व सर्व आदरणीय प्रतिष्ठित मंडळी आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो आज संपूर्ण जगामध्ये 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' साजरा केला जात आहे हा खास समारंभ साजरा करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, आपल्या जीवनात महिला अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात मग ती भूमिका आपल्या आईची असो, पत्नीचे असो, बहिणीची असो किंवा आजीच्या स्वरूपात असो महिलांकडून पुरुषांना प्रत्येक स्वरूपात पाठिंबा मिळत असतो. प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एक महिला असते त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या कुटुंबातील आणि समाजातील योगदानाचा आपण हा गौरव दिन साजरा करत असतो. असे फार कमी वेळा घडते त्यामुळे आज 'आंतरराष्ट्रीय महिला दिना'निमित्त आपल्याला आपल्या आयुष्यातील महिलांना त्यांच्या कार्यासाठी आणि त्यांच्या भूमिकेसाठी या ठिकाणी सन्मानित करायचे संधी मिळालेली आहे.


(हे पण वाचा - Womens Day Wishes: 'ती' जी प्रत्येकात रुजलीय... जागतिक महिला दिनाच्या हार्दिक)


खरं पाहिलं तर महिलांच्या कार्याचा आपण दररोज सन्मान केला पाहिजे. विशेषतः 'महिला दिनी' आपण आपल्या घरातील महिलांना त्या आपल्यासाठी कशा राबतात याची जाणीव करून दिली पाहिजे. त्यांना आपण विशेष आहोत असे वाटावं, यासाठी आज तुम्ही त्यांना त्यांच्या कामात मदत करू शकता किंवा सरप्राईज देखील देऊ शकता. याशिवाय आपण आपल्या घरातील महिलांना एखादा छोटाखानी कार्यक्रम आयोजित करून किंवा त्यांना बाहेर कुठेतरी फिरायला घेऊन येऊन विशेष अनुभव देऊ शकता. तसेच तुम्ही त्यांची आवडती अशी एखादी भेटवस्तू देखील त्यांना देऊन आनंदी करू शकता आपल्या जीवनातील महिलांच्या योगदानाबद्दल ऋण आपण कधीच खेळू शकणार नाही तरी आपण आपल्या पातळीवर अनेक गोष्टी करून त्यांचा सन्मान देखील करू शकतो.


मला अशी आशा आहे की, महिला दिनाविषयी आपण सर्वजण आपल्या जवळच्या महिलेला मदत करण्याचा प्रयत्न करुया. आपल्या आयुष्यातील सर्व महिलांच्या योगदानासाठी दररोज सन्मान करूया आणि त्यांना कायम गौरवानिमित्त वाटेल असे वागू या.


शेवटी कविता या ठिकाणी मी सादर करतो


आदिशक्ती तू
प्रभूची भक्ती तू
झाशीची राणी तू
मावळ्यांची भवानी तू
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू 
आजच्या युगाची प्रगती तू 
महिला दिनाच्या सर्व महिला भगिनींना खूप खूप शुभेच्छा


नमुना -2 


प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या पाठीशी महिला ही असतेच. अशा या नारीशक्तीला मानाचा मुजरा. 
मान्यवर, गुरुजन वर्ग, उपस्थित विद्यार्थी मित्र आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो...
शिवरायांच्या स्वराज्य स्थापन करण्यामागील प्रेरणा असणाऱ्या माता जिजाऊ, स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. 


स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य
स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व


दरवर्षी 8 मार्च रोजी 'जागतिक महिला दिन' अर्थात 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' साजरा केला जातो. हा दिवस  प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे.


इतिहासात डोकावलात तर मार्च 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो महिला कामगारांनी रूटगर्स चौकात जमून ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या. नंतर 1910 मध्ये कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या आंदोलनाच्या स्मरणार्थ हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारण्याचा ठराव झाला. यानंतर दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन अर्थात 'आंतरराष्ट्रीय महिला दिन' म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.


'आंतरराष्ट्रीय महिला दिन' साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे, तसेच महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे. यासाठी एवढेच म्हणेन की, 


सामर्थ्याची ओढून ये नवी झालर, स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर !!"