18 कॅरेट व्हाईट गोल्डचं घड्याळ आणि... नीता अंबानींनी IPL Auction 2025 लूकसाठी केला `इतका` खर्च
Nita Ambani IPL Auction 2025 : नीता अंबानींच्या संपूर्ण लूकची किंमत इतकी मोठी, की त्यात एखाद्या सामान्याचं घरभाडं, नवं घर, कितीतरी वर्षांचा पगार आणि फॉरेन ट्रीपचाही खर्च निघेल...
Nita Ambani IPL Auction 2025 : नुकत्याच पार पडलेल्या IPL लिलाव प्रक्रियेनंतर आता अनेक चर्चांना उधाण आलं. या लिलावात सर्वाधिक बोली लागलेल्या खेळाडूपासून सर्वात कमी किमतीची बोली लागलेल्या खेळाडूपर्यंत आणि अगदी लिलावातील काही नव्या चेहऱ्यांच्या सहभागाबद्दलही बोललं गेलं. पण, यातही विशेष लक्ष वेधलं ते म्हणजे मुंबईच्या संघाच्या वतीनं तिथं हजर असणाऱ्या आणि संघाची महत्त्वाची सूत्र हाताळणाऱ्या नीता अंबानी यांनी.
दुबईतील जेद्दाह इथं पार पडलेल्या या लिलावादरम्यान नीता अंबानींचा लूक कमालीच्या Professionalism चं प्रतिबिंब ठरला. इथं त्यांनी 'मेज पॅरिस' ब्रँडच्या एका नेव्ही ट्विड सूटला पसंती दिली होती. हा लूक पूर्ण करण्यासाठी त्यांनी सुरेख अशा अॅक्सेसरीजनाही प्राधान्य दिलं होतं. यामध्ये सर्वात महागडी अॅक्सेसरी ठरलं त्यांचं रोलेक्स कंपनीचं घड्याळ.
नीता अंबानी यांनी आयपीएलच्या लिलावादरम्यान रोलेक्सचं 18 कॅरेट व्हाईट गोल्ड घड्याळ घालत कमालीचा स्टाईल सेन्स दाखवून दिला. रोलेक्सच्या या घड्याळाला 'डे डेट' असं म्हटलं जातं. The Indian Horology नं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार या अतिशय उच्चभ्रू घड्याळाची किंमत आहे ₹1,05,07,000 म्हणजेच ₹1.05 कोटींपेक्षाही जास्त आहे. या घड्याळामध्ये हिरे आणि सप्तरंगी नीलम जडले आहेत.
फक्त हे घड्याळच नव्हे, तर नीता अंबानी यांचा एकंदर लूकच एक 'मास्टरपीस' असल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या सूटला दोन बाजूंनी उघडणारे फ्लॅप पॉकेट, लोगो जॅग्वार लायनिंग, एम्बॉस्ड सिल्व्हर बटन होते. या लूकला पूर्ण करण्यासाठी त्यांनी डायमंड स्टड कानातले, हातात हिऱ्याची चकाकणारी अंगठी, प्राडा सनग्लासेस, मुंबईच्या संघाचं प्रतीक म्हणून हिरेजडित M आकाराचा ब्रूच, लक्झरी हँडबॅग आणि स्लीक स्टीलेटो हिलला पसंती दिली होती. नीता अंबानींनी या लूकवर केलेला खर्चच कोट्यवधींच्या पलिकडे असल्यामुळं सोशल मीडियावर त्यांच्या या रुपाची बरीच चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
हेसुद्धा पाहा: भुरभुरणारा पांढराशुभ्र बर्फ, रक्त गोठवणारी थंडी अन्... 39 सेकंदांच्या Video मध्ये पाहा काश्मीरमधील हिमवर्षावाचा कमाल नजरा
नेटकरीसुद्धा त्यांच्या या लूकवर कमेंट करत, इतका पैसा आपल्याला कोणी दिला तर आधी नेमकं काय करु, याविषयीचे कमाल पर्याय मांडत आहेत. कोणी घराचं कर्ज फेडण्याचा विचार करतंय, तर कोणी नवं घर घेण्याचा, कोणी नवी कार खरेदी करण्याचा विचार करतंय तर कोणी नोकरी सोडून जगभ्रमंतीसाठी निघण्याचा. थोडक्यात नेटकऱ्यांनी अंबानींच्या या लूकच्या निमित्तानं आपल्या कल्पनाशक्तीला वाव दिलाय खरा... नाही का!!