Parenting Tips For Stubborn Child : मुलं ऐकत नाही, चारचौघात गोंधळ घालतात, कोणत्याही गोष्टीवर हट्टीपणा करतात, असा एक ना अनेक पालकांचा प्रश्न असतो. मुलांसमोर अक्षरशः काही पालक गुडघे टेकतात. कारण मुलं काही केल्या ऐकतच नाही. लाजीरवाण्या प्रसंगाला सामोरे जाण्यापेक्षा पालक मुलं सांगतात ते ऐकतात. पण याचा उलट परिणाम असा होतो की, विनाकारण मुलं हट्टी बनतात. अशावेळी पालकांसमोर यक्ष प्रश्न उभा राहतो की, काय करावे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पालकांनी खालील दिलेल्या टिप्सचा नक्की उपयोग करावा कारण यामुळे मुलं शांत होतात आणि पालकांच ऐकतात. 


समजवण्याचा प्रयत्न करा 


जेव्हा मूल एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करू लागते तेव्हा त्याला शिव्या देण्याऐवजी किंवा मारण्याऐवजी समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. आरामात बसा आणि त्याच्याशी संभाषण करा. मुलांना त्यांच्या पद्धतीने समजावून सांगितल्यावर त्यांना पटकन समजते.


न ऐकण्याच कारण सांगाव


जर मूल एखादी गोष्ट घेण्याचा आग्रह करत असेल आणि त्याचा काही उपयोग होत नसेल, तर त्याला समजावून सांगा की तुम्हाला ती वस्तू का मिळत नाही.


रडू द्या 


जर मुल त्याच्या काही इच्छा पूर्ण होण्यासाठी रडत असेल किंवा ओरडत असेल, तर निःसंशयपणे तुमची चिडचिड होत असेल आणि तुमच्या सोबत इतर लोकही अडचणीत येण्याची शक्यता आहे, परंतु काही काळ त्याला असेच रडायला सोडा. जेव्हा तो पाहतो की तुम्हाला त्रास होत नाही, तेव्हा तो काही वेळाने शांत होईल.


दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा


जर मूल तुम्हाला त्याची इच्छा स्वीकारण्यासाठी खूप त्रास देत असेल, तर त्याला रडू द्या आणि त्याच्या या स्वभावाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. हळूहळू तुम्हाला त्यांचा स्वभाव समजेल आणि मग त्यांना हाताळणे तुमच्यासाठी सोपे होईल.


या 4 गोष्टी मुलांशी बोला 


अरे.. माझ्या मुलाला राग आला, ये आणि आईला मिठी मार.
जर मुलाने तुम्हाला मिठी मारली तर तुम्ही समजू शकता की त्याचा अर्धा राग शांत झाला आहे.
मला माहित आहे की तू का रागावला आहेस? अशा स्थितीत मलाही राग यायचा.
असे बोलून तुम्ही त्याच्या भावना स्वीकारता.
आपण नाराज असू शकतो, परंतु त्यामुळे आपण कोणालाही दुखवू शकत नाही.
तुम्ही असे म्हणता तेव्हा तुम्ही सीमा सेट करा.
प्रथम दीर्घ श्वास घ्या आणि एक ग्लास पाणी प्या, मग आपण याबद्दल बोलू
असे बोलून तुम्ही त्याला त्याच्या भावना नियंत्रित करायला शिकवता.