बॉलिवूडमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्री यांचं वय आता वाढलंय. तरीदेखील उतार वयात त्यांची एनर्जी तरुण कलाकारांनादेखील लाजवेल अशी आहे. उतार वयात सर्वसाधारण अनेक समस्या जाणवतात. चेहऱ्यावर सुरकुत्या तर केस गळतीची समस्या...ही समस्या कलाकारांदेखील जाणवते. पण महागातील महाग ट्रिटमेंट घेऊन ते त्यावर मात करतात आणि 80 वयाच्या टप्प्यातही चिरतरुण दिसतात. कलाकारांसाठी त्यांचं सौंदर्य आणि अभिनय हेच सर्वकाही असतं. जर एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्याला टक्कल पडलं तर...तुम्ही त्या कलाकाराला असं कल्पनेतही बघू शकतं नाही. पण बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत. ज्यांच्या डोक्यावरील केस आजही तरुणपणासारखे घनदाट आहे. अशात चाहत्यांना प्रश्न पडतो ते केस खरे आहे की त्यांनी विग लावला आहे, की कुठली केस प्रत्यारोपणची शस्त्रक्रिया केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या यादीत पहिलं नाव आहे बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांचं, ज्यांना पाहून प्रत्येकाला असं वाटतं की त्यांचे केस खरे आहेत की नाहीत. वयाच्या 82 व्या वर्षी बिग बींचे केस एवढे छान कसे. हे सत्य डॉ.गौरांग कृष्णा सर्वांसमोर सांगितलंय. 


अमिताभ बच्चन यांचे पांढरे केस खरे की खोटे, याबाबत सर्वांच्या मनात संभ्रम आहे. सत्य हे आहे की बिग बींच्या ओठांवरील आणि डोक्यावरील केस हे बनावट आहेत. डॉक्टर गौरांग म्हणतात की, 'अमिताभजींना केसांचे पॅच लावले आहेत आणि ते बऱ्याच काळापासून ते वापरत आहेत. आणि असे दाट केस कोणत्याही उपचाराने किंवा केस प्रत्यारोपणाने मिळवता येत नाहीत. बिग बी केसांचा विग या पॅचमधून वापरतात. तुम्ही पाहिलं असेल जेव्हा अमिताभ बच्चन हॉस्पिटला जातात किंवा जलसा या बंगल्याबाहेर चाहत्यांना भेटायला येतात. तेव्हा त्यांच्या डोक्यावर थंडी असो वा नसो टोपी असते. त्यामागील कारणच असं आहे की, अमिताभ बच्चन यांना टक्कल असून ते विग वापरतात. विग लावला नसेल तर ते टोपी घालतात. 


लोक विग निवडण्याचं कारण काय आहे?


डॉ. गौरांग म्हणाले की, 'हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की, सध्या हेअर ट्रान्सप्लांट इतके लोकप्रिय असतानाही अनेक लोक ते करून घेत आहेत, मग लोक पॅच का घालत आहेत. यामध्ये अनेक घटक आहेत. 'उदाहरणार्थ, बरेच लोक शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीयदृष्ट्या योग्य नाहीत, बरेच लोक घाबरतात कारण ही शस्त्रक्रिया आहे, तुम्हाला तीन दिवस काढावे लागतात. शिवाय अनेकांना झटपट निकाल हवे असतात. 


केस प्रत्यारोपण म्हणजे काय?


केस गळतीमुळे ज्यांचे केस वाढणे थांबते किंवा सर्व केस गळतात अशा लोकांसाठी हेअर ट्रान्सप्लांट केले जाते. हे एक शस्त्रक्रिया तंत्र आहे ज्यामध्ये शरीराच्या एका भागातून केसांचे कूप काढून टाकले जातात आणि टक्कल पडलेल्या किंवा गळणाऱ्या केसांच्या भागावर ठेवतात. ज्या ठिकाणाहून केसांचे कूप घेतले जाते त्या जागेला डोनर साइट म्हणतात आणि टक्कल पडलेल्या भागाला प्राप्तकर्ता साइट म्हणतात.


नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अभ्यासानुसार , 'केस गळण्याची समस्या खूप सामान्य आहे, जी 67% पुरुष आणि 24% महिलांना प्रभावित करते. मिनॉक्सिडिल, फिनास्टराइड, ड्युटास्टेराइड, लो लेव्हल लाइट थेरपी, प्लेटलेट-समृद्ध प्लाझ्मा, एडेनोसिन आणि केटोकोनाझोल यासारखे अनेक गैर-सर्जिकल उपचार आहेत जे केस गळणे कमी करू शकतात आणि नवीन केसांच्या वाढीस प्रोत्साहन देऊ शकतात.'


हेअर विग आणि केस पॅचमध्ये फरक काय?


हेअर पॅच म्हणजे काय- हेअर पॅच केसगळतीचे विशिष्ट क्षेत्र कव्हर करते. उदाहरणार्थ, जर तुमच्या कपाळावर केस कमी असतील तर तुम्ही त्या जागेवर पॅच लावू शकता. किंवा केस कुठेतरी पातळ झाले असतील तर तिथेही हेअर पॅच वापरता येऊ शकतात. विग प्रमाणे, हे देखील टाळूवर लावले जातात.


विग म्हणजे काय - जेव्हा आपण विगबद्दल बोलतो तेव्हा ते आपले संपूर्ण डोके केसांनी झाकते आणि हेअरस्टाइलप्रमाणे डोक्याला चिकटते. स्कॅल्प विग लोकांच्या वास्तविक केसांसारखे दिसतात आणि आपण आपल्या आवडीच्या कोणत्याही केशरचनामधून निवडू शकता. विग आणि हेअर पॅच दोन्ही सिंथेटिक केसांपासून बनवले जातात.


(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)