जन्माष्टमीचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळतो. आज 26 ऑगस्ट रोजी रात्री बारावाजता श्रीकृष्णाचा जन्म साजरा केला जातो. यानंतर बाळगोपाळाचा जन्मोत्सव साजरा केला जातो. या दिवशी किंवा उद्या गोपाळकाल्याच्या दिवशी घरी गोंडस मुलीचा जन्म झाला तर मुलींसाठी खालील नावांचा नक्की विचार करा. 


श्रीकृष्णाची मुलांसाठी नावे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मानव 
मानव या नावाचा अर्थ आहे 'गर्वित व्यक्ती'. संस्कृतमध्ये या नावाचा अर्थ आहे मान, सन्मान असा. गर्व असा देखील या नावाचा अर्थ आहे. 


समर 
समर नावाचा अर्थ आहे योद्धा. जी व्यक्ती लढाईमध्ये माहिर असा या नावाचा अर्थ आहे. हे नाव युद्ध, साहस या स्वभावाशी संबंधित आहे. मुलासाठी या नावाचा विचार नक्कीच करु शकता. 


मानस 
मानस या नावाचा अर्थ आहे स्वाभिमानी. भारतीय संस्कृतीमधील हे नाव अतिशय लोकप्रिय असं नाव आहे. जे व्यक्ती स्वाभिमानी आणि आत्मसन्मानासाठी ओळखले जातात. त्यासाठी या नावाचा उल्लेख केला जातो. 


अधिराज 
अधिराज या नावाचा अर्थ आहे सर्वोच्च राजा आहे. गर्वाने भरलेला राजा असा या नावाचा अर्थ आहे. अधिराज या नावाचा उल्लेख मुलासाठी करु शकतात. गर्व, शक्ती आणि नेतृत्व असा देखील या नावाचा अर्थ आहे. 


प्रल्हाद 
प्रल्हाद हे नाव अतिशय उत्साही आहे. या नावात खास अर्थ दडला आहे. तसंच हे नाव उच्चारायला देखील छान वाटते. प्रल्हाद या नावाचा अर्थ आहे प्रसन्न. भगवान विष्णुच्या परम भक्ताचे हे नाव आहे. 


अहिल 
अहिल हे नाव अतिशय युनिक आहे. मुलासाठी या नावाचा नक्की विचार करा. अहिल या नावात देखील गर्व, सन्मान असाच अर्थ जोडलेला आहे. मुलाच्या नावात अतिशय सात्विकपणा तुम्हाला यामध्ये अनुभवता येईल. 


राधेची मुलींसाठी नावे 


वृंदा
माता तुळशी किंवा देवी राधा यांना वृंदा असेही म्हणतात. वृंदा हे तुळशीच्या रोपाचेही लोकप्रिय नाव आहे.


गौरांगी
आनंद देणाऱ्याला गौरांगी म्हणतात. राधा देवीला गौरांगी या नावानेही संबोधले जाते. गौरांगी या नावाचा अर्थ भगवान श्रीकृष्णाचा प्रिय आणि गोरा वर्ण आहे.


केशवी
जर तुमच्या मुलीचे नाव 'के' अक्षराने सुरू होत असेल तर तुम्ही तिचे नाव केशवी ठेवू शकता. केशवी नावाचा अर्थ देवी राधा आणि लांब सुंदर केस असलेली स्त्री.


मन्मयी 
मन्मयी हे नाव मुलींसाठी खास असेल. मन्मयी नावाचा अर्थ राधा राणी. कृष्णाची लाडकी राधा राणी हिला मन्मयी असेही म्हणतात.


राधिका
जर तुमच्या मुलीचे नाव 'र' अक्षरावरून आले असेल तर तुम्ही तिचे नाव राधिका देखील ठेवू शकता. राधिका हे नाव मुलींसाठी खूप लोकप्रिय आहे. राधिका नावाचा अर्थ देवी राधा, यशस्वी, भगवान कृष्णाची प्रिय आणि श्रीमंत आहे.


रिद्धिका
हे नाव मुलीसाठी देखील खूप चांगले असेल. आपण ते अद्वितीय आणि पारंपारिक नावांच्या यादीमध्ये ठेवू शकता. रिद्धिका या नावाचा अर्थ यशस्वी, प्रेम किंवा भगवान श्रीकृष्णाचा प्रिय असा आहे. राधा राणीला रिद्धिका असेही म्हणतात.