Jaya Kishori Relationship Tips :  लग्न, संसार.. नवरा-बायकोचं हे नातं अतिशय वेगळं आणि खास आहे. या नात्यामध्ये अनेक गोष्टी दोघांनी समजून उमजून करायच्या असतात. अशावेळी जया किशोरी यांनी विचारलेला प्रश्न सगळ्यांनाच अंर्तमुख करायला लावणारा आहे. जया किशोरी विचारतात की, जावयाला त्याचं सासर कधी आपलं घर का वाटत नाही. तर सूनेला तिचं सासर अगदी दुसऱ्या दिवशीच आपलं घर वाटू लागतं असं का?


जया किशोरी यांच उत्तर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कित्येक वर्ष होऊनही जावयाला कधी सासरं आपलं घर का वाटत नाही. पण लग्नाला दोनच दिवस झालेल्या मुलीला सासरंच आपलं घर का वाटू लागतं? विचार करायला लावणारा जया किशोरी यांचा हा प्रश्न. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशीच त्या नववधुला हेच आपलं घर असल्यासारखं वाटतं. असं का होतं? याबाबत कथावाचक जया किशोरी यांनी उलघडलं कटू सत्य. नवरा-बायको हे एक नातं आहे. ते जपत असताना दोघांनी कोणती काळजी घ्यायला हवी याबाबतही जया किशोरी यांनी केलं भाष्य.


तडजोड करा  बदलायला लावू नका 


जया किशोरी सांगतात की, पत्नीला तडजोड करायला सांगा पण तिला पूर्णपणे बदलून टाकायला सांगू नका. कारण यामुळे ती पूर्णपणेच बदलून जाईल आणि तिच्यातील 'ती'च संपून जाईल. अनकेदा पती पत्नीला तडजोड करायला सांगण्यापेक्षा बदलायला सांगतो. हे बरं नव्हे कारण ती व्यक्ती म्हणून पूर्णपणे बदलून जाते. 


काय म्हणाल्या जया किशोरी?



एकमेकांना समजून घ्या 


पती-पत्नीचं हे नातं एकमेकांना समजून घेण्याचं आहे. त्यामुळे ते दोघांना सांभाळायचं आहे. काम दोघांनाही करायचं आहे. एकच व्यक्ती अनेक वर्ष एकट्याने हा संसाराचा गाढा ओढू शकत नाही. त्यामुळे संसार दोघांनी करायचा असतो. परमेश्वराने नवरा-बायकोची वेगवेगळी अशी कामे काही सांगितली नाहीत. त्यामुळे प्रत्येक काम दोघांनी करायला हवं. 


पत्नीची जागा पती ठरतो 


सासरी पत्नीची किंवा महिलेची जागा काय असेल हे नवरा ठरवतो. कारण त्या नवऱ्यासाठी पत्नी आपलं घर सोडून येते. ती त्याच्या विश्वासावर आलेली असते त्यामुळे पतीने पत्नीला घरी योग्य सन्मान आणि स्थान देणे गरजेचे आहे. पत्नीला सासरी मिळाला मान आणि अपमान हे दोन्हीही पतीवर अवलंबून असतं. पत्नीची जागा पती निश्चित करत असतो, अस जया किशोरी म्हणाल्या