Kitchen Tips : कांद्याचा असाही उपयोग! रात्री झोपण्यापूर्वी वॉश बेसिनमध्ये कांदा फिरवा अन् बघा चमत्कार
Wash Basin Cleaning: काळेकुट आणि मळकट असेलचे घरगुती बेसिन ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. तुमचे बेसिन कितीह घासल्यानंतर चकचकीत आणि स्वच्छ होत नसेल तर काही सोप्या टीप्स...
How to Clean Wash Basin News In Marathi : वारंवार भांडी घासल्यामुळे बेसिंग मळकट होते. कितीही घासले तरीही बेसिगवरील काळेपणा निघून जात नाही. वॉशबेसिंग म्हटल तर दात घासणे, हात धुणे यासारख्या गोष्टींसाठी बेसिंगचा वापर करावाचं लागतो. मग अशावेळी काळे-पिवळे वॉश बेसिन पाहून किळसवाणे वाटू शकते. तुम्ही कितीही मेहनत केली तरी वॉश बेसिन चकचकीत होत नसेल अथवा जिद्दी डाग जात नसतील तर त्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत... तुमच्या घरातील वॉश बेसिन कसं साफ करु शकता ते जाणून घ्या...
वॉश बेसिनवर दात सतत घासणे, भांडी घासणे, चूळ भरणे, हात धुणे यासारख्या कामासाठी वापर करत असतो. कितीही स्वच्छता केली तरी किचनमध्ये झुरळ दिसतात. अशा परिस्थितीत अनेक उपाययोजना कराव्या लागतात. वारंवार साफसफाईची आवश्यकता असते. स्वयंपाकघरातील प्रत्येक वस्तू वापरण्यापूर्वी स्वच्छ करणे आवश्यक आहे. यात आपला बराचसा वेळ जातो. झुरळ आणि मुंग्या होऊ नयेत म्हणून कितीहा औषधे वापरली तरीही पुन्हा झुरळ दिसू लागता. अशावेळी काय करावे सुचत नाही. आता काळजी करण्याचे कारण नाही, कारण आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
तुम्हाला झुरळापासून सुटका हवी असल्यास तुमचे स्वयंपाकघर साफ करताना, तुम्हाला तुमचे बेसिन देखील स्वच्छ करावे लागेल. कारण बेसिनच्या पाईप्समधून झुरळ स्वयंपाक घरात शिरु शकतात. त्यामुळे बेसिन स्वच्छ करावे लागेल. यासाठी एक कांदा घ्या आणि त्याच्या मदतीने बेसिग साफ करा.
रात्री झोपण्यापूर्वी बेसिन कसे स्वच्छ करावे?
- सर्व काम पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बेसिन स्वच्छ करू शकता.
- यासाठी तुम्हाला एक कांदा आणि अर्धा कापा
- त्यावर मीठ टाकून संपूर्ण बेसिन धुवा.
- कांद्याचा रस सर्वत्र लागेल याची खात्री करा.
- कांद्याच्या वासामुळे झुरळ बेसिनमधून स्वयंपाकघरात शिरणार नाहीत.
- हा चिरलेला कांदा तुम्ही आठवडाभर वापरू शकता.