Kitchen Jugaad Video : तुम्ही फ्रीजमध्ये कधी चहा ओतलाय? परिणाम पाहाल तर थक्क व्हाल
Kitchen Jugaad Video : अनेकजण चहा शिल्लक राहीला की फ्रीजमध्ये ठेवतात. पण चहा असाच फ्रिजमध्ये ठेवण्याऐवजी किंवा कपात ओतण्याऐवजी तो फ्रिजमध्ये ओतून पाहा... परिणाम पाहाल तर तुम्ही थक्क होऊन जाल.
Kitchen Tips News in Marathi : चहा आवडणाऱ्यांसाठी चहा ही गरज असते आणि सवयही. चहाने दिवसाची सुरुवात होणे ही अनेकांसाठी सामान्य बाब आहे. मात्र याच चहाचा तुम्ही इतर गोष्टींसाठी ही वापर करु शकता. जसे की तुम्ही जर शिल्लक राहिलेला चहा रात्री झोपताना फ्रीज मध्ये ओतला... तर काय होईल? तुम्हाला माहितीय का? फ्रीज आणि चहाचा हा जबरदस्त असा किचन जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे.
गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात. दरम्यान अशाच एक स्वयंपाकघरातील जुगाड दाखवणारा अनोखा व्हिडीओ एका महिलेने शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही कधी फ्रीजमध्ये चहा ओतला आहे का? नाही ना.. मग एकदा फ्रीजमध्ये चहा ओतून बघा. हा जुगाड तुमच्या दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांवर मात करेल. चहा ओतल्यानंतर फ्रीजमध्ये झालेले बदल पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. एका गृहिणीने या जुगाडाचा शोध लावला असून या अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गृहिणींकडे अनेक घरगुती युक्त्या असतात. काही गृहिणी हा जुगाड सोशल मीडियावर शेअर करतात. अशाच एका गृहिणीने जुगाड केलाचा व्हिडीओ शेअर केला आहे जो सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये फ्रीजमध्ये चहा ओतचा कमाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. हा प्रयोग तुम्ही देखील करुन पाहा...
अनेकदा फ्रीजमधून कशाचातरी असह्य वास येत असतो. मात्र आपल्याला कळतनाही हा वास नेमका कोणता आहे? अशावेळी फ्रिज तातडीने स्वच्छ करणे आवश्यक आहे. पण कधीकधी फ्रीज स्वच्छ करुनही हा वास येतच असतो. पण आता काळजी करण्याची गरज नाही. कारण व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे तुम्ही टेन्शन फ्री राहू शकता. अनेकजण उरलेला चहा फ्रीजमध्ये ठेवतात. पण तुम्हाला हवे असल्यास ते फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी फ्रीजमध्ये ओता.
तुम्हाला नेमकं काय करायचं
एक वाटी घ्या त्यात चहा पावडर टाका आणि थोड गरम पाणी घ्या
त्यानंतर त्यात थोडीशी आपण रोज चेहऱ्याला लावत असलेली पावडर मिक्स करा.
हे मिश्रण पातळ होईल एवढं पाणी त्यात टाकणं गरजेचं आहे.
यानंतर हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि हा स्प्रे फ्रिजमध्ये मारा.