Benefits of eating Khichadi: खिचडीला सुपर फूड म्हटले जाते. कारण खिचडी हा एक असा पदार्थ आहे जो भारताच्या जवळपास सगळ्याच भागात खाल्ला जातो. खिचडी खायला चविष्ट असतेच पण त्याने आपल्या आरोग्यालाही अनेक प्रकारे फायदे होतात. खिचडी तयार करणं अतिशय सोप्पे आहे. जेवणासाठी काय करायचं जेव्हा सुचत नाही तेव्हा अनेक वेळा खिचडीला प्राधान्य दिलं जातं. एवढंच नाही तर आवडता पदार्थ म्हणूनही रात्रीच्या स्वयंपाकात खिचडी केली जाते. तुम्हाला माहिती आहे का? खिचडी खाण्याचे अनेक फायदे आहेत. 


पोषकतत्वांनी परिपूर्ण खिचडी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


खिचडी बनवायला खूप सोप्पी असते. सर्वसाधारणपणे खिचडी ही डाळ आणि तांदूळ घालून बनवली जाते. पण तुम्ही आवडीनुसार त्यात भाज्या आणि तूपही घालू शकता. खिचडी पचायला सोपी असते. त्यामुळे ती आरोग्यदायी मानली जाते. या झटपट तयार होणाऱ्या पदार्थात प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फायबर, हेल्दी फॅट्स यासह संतुलित मॅक्रोन्युट्रिएंट्स असतात ज्यामुळे तुमच्या शरीराला फायदा होतो. 


खिचडी खाण्याचे फायदे 


 


1. पचनसंस्था निरोगी राहते


तज्ञ सांगतात खिचडी हे सहज पचणारा अन्न पदार्थ आहे. अनेक गोष्टी खाल्ल्याने तुमच्या पोटात जळजळ होते. पण रात्रीच्या वेळीही खिचडी खाल्ल्यावर तुम्हाला असा कोणताच त्रास होत नाही. खिचडी हा हलका पदार्थ आहे. त्यामुळे त्याने पचना संबंधित कोणताही त्रास होत नाही. 


2. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत


आयुर्वेदानुसार आहारात खिचडीचा समावेश केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. त्याने शरीरातील ऊर्जा संतुलित राहते. खिचडीमुळे शरीरातील तीन दोष म्हणजे वात, पित्त, कफ यांच्यात समतोल साधला जातो. 


3. शरीर डिटॉक्स होते


खिचडीत फायबर असल्ययाने त्यामुळे शरीर डिटॉक्स होते. शरीरात विषारी पदार्थ जमा करतात. शरीरातून घान बाहेर टाकण्यासाठी खिचडी मदत करते. 


4. वजन नियंत्रित ठेवण्यास मदत


खिचडीमध्ये कॅलरीज आणि फॅटस् कमी असतात. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. खिचडीत फायबरचे प्रमाण जास्त असल्याने दीर्घकाळ पोट भरलेले राहते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी खिचडीचा आहारात समावेश केल्यास फायदा होऊ शकतो.


5. मधुमेहाचा त्रास कमी करण्यासाठी 


साबुदाण्यापासून तयार केलेली खिचडी खाल्यामुळे मधुमेहचा त्रास कमी करण्यास मदत होते. शरीरातील इन्सुलिन टिकवून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे खिचडी खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.


(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)