जाणूनबुजून किंवा नकळत रात्री फॉलो केल्या जाणाऱ्या `या` सवयी आरोग्यासाठी ठरू शकतात घातक
Worst Habits For Sleep: जर तुम्हीही रात्रीच्या वेळी अशा काही सवयी पाळत असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. या सवयींमुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
Worst Habits: दैनंदिन जीवनात आपल्या प्रत्येकाला काही सवयी असतात. या सवयी आपल्यासाठी फायदेशीर ठरतात. तर काही पाळल्या जाणाऱ्या काही सवयी हळूहळू तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू लागतात. अशा सवयींची आपल्याला जाणीवही नसते. तुम्हालाही स्वत:ला निरोगी ठेवायचे असेल तर रात्रीच्या वेळी काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. रात्रीच्या वेळी अशा सवयी पाळणाऱ्या लोकांना भारी पडू शकते.
रात्री कॉफी पिण्याची सवय
काहींना कॉफीशिवाय फक्त दिवसच नाही तर रात्रही अपूर्ण वाटते. पण तुम्हाला हे माहित आहे का की रात्री कॉफी प्यायल्याने तुमच्या झोपेच्या चक्रावर वाईट परिणाम होतो. रात्री झोपण्यापूर्वी कॉफी प्यायल्याने तुम्हाला निद्रानाशाची समस्या भेडसावू शकते. त्यामुळे, ही सवय लवकरात लवकर सुधारणे चांगले.
रात्री उशिरा जेवण करणे
तुम्ही रात्री उशीरा जेवता? जर तुम्ही रात्री उशिरा जेवण करत असाल तर तुमच्या या सवयीचा तुमच्या आतड्याच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. रात्री उशिरा जेवल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो. जर तुमच्या पोटाचे आरोग्य चांगले नसेल तर त्याचा वाईट परिणाम तुमच्या एकूण आरोग्यावरही दिसून येतो. त्यामुळे झोपण्याच्या दोन ते चार तास आधी जेवावे.
हे ही वाचा: Tricks To Peel Green Peas: मटार सोलायला त्रास होतोय? 'या' ट्रिक्सने काम होईल झटपट
रात्री फोन वापरताना झोपण्याची सवय
अनेक लोक रात्री झोपण्यापूर्वी बेडवर पडून आपला फोन वापरत असतात. झोपण्यापूर्वी स्क्रीन एक्सपोजर तुमच्या मेंदूच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते. रात्री तुमचा फोन वापरल्याने तुमची तणावाची पातळी देखील वाढू शकते ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप घेण्यात अडचण येऊ शकते. झोपण्याच्या किमान एक तास आधी कोणत्याही प्रकारच्या स्क्रीनचा वापर थांबवावा.
हे ही वाचा: 12 वर्षाच्या मुलीच्या बलात्काराचा बदला घेण्यासाठी कुवेतमधून बाप आला भारतात आणि...
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)