Twins Indian Baby Girl Names And Meaning :  मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर खूप ऍक्टिव आहे. कधी फॅशन स्टेटमेंट तर कधी लेकींच्या गमतीजमती क्रांती सोशल मीडियावर शेअर करत असते. क्रांतीने पहिल्यांदाच लेकींची झलक दिसेल असेल व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गोदो आणि छबील अशी टोपण नावे कायम क्रांती सोशल मीडियावर घेत असते. पण या दोघींची खरी नावे फारच कमी लोकांना माहित आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रांती रेडकरने पती एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी 'खुपते तिथे गुपते' या कार्यक्रमात लेकींच्या नावामागची गोष्ट देखील शेअर केली आहे. मुलांना आपणं नावे देतो तेव्हा त्यामागे असंख्य विचार असतात. समीर आणि क्रांतीने लेकींना दिलेल्या नावामागे काय आहे किस्सा, जाणून घ्या


क्रांतीच्या जुळ्या मुलींची नावे 



क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांनी जुळ्या लेकींना 'झिया' आणि 'जायदा' अशी नावे दिली आहे. या दोन्ही नावांचे अर्थ अतिशय खास आहेत. 


  • 'झिया' - झिया या नावाचा अर्थ आहे प्रकाश. एक प्रकारचं वैभव म्हणजे झिया.

  • 'झायदा' - झायदा असं क्रांती आणि समीरच्या मुलीच्या ट्विन्समुलीचे नाव आहे. या नावाचा अर्थ आहे  भाग्यवान आणि समृद्ध. 


नावामागची गोष्ट 


समीर वानखेडे यांनी काही दिवसांपूर्वी अवधुत गुप्तेच्या 'खुपते तिथे गुप्ते' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी लेकीच्या नावामागची गोष्ट सांगितली आहे. . 'झायदा' नाव हे समीर यांच्या आईच्या नावावरून ठेवलंय. त्यांच्या आईचं नाव 'झायदा' होतं. तर, 'झिया'चं नाव समीर यांच्या आत्याच्या नावावरून ठेवलंय. समीर म्हणाले, 'आत्याला कॅन्सर झाला होता आणि माझं आत्यावर खूप प्रेम होतं, त्यामुळे तिच्या नावावरून मुलीचं नाव ठेवलं.' 


जुळ्या मुलींची नावे 


  • आरूषी – आहाना :सूर्याची पहिली किरणे, सूर्याचे पहिले किरण 

  • आरझू – आकांक्षा  :  इच्छा, प्रबळ इच्छा असणे

  • आशी – अशिता : आनंद, सुख, समाधान

  • करिश्मा – कशिश : आकर्षक अशा मुली, अत्यंत सुंदर आणि आकर्षक

  • अधाया – आकर्षा : शक्तीशाली, बलशाली, ताकदवान


मुलींची नावे आणि अर्थ


  • मोहिनी – मेनका : सुंदर, अप्सरांची नावे, दिसायला अत्यंत सुंदर अशा 

  • आशा – अपेक्षा :आशा, कोणतीही चांगली गोष्ट घडणार असा विश्वास असणे, एखाद्याकडून काहीतरी अपेक्षा असणे

  • अमिशा – अनाया : सुंदर, अप्रितम

  • चारू – चार्वी :  दिसायला सुंदर, देखणी

  • दीपा – दीपिका : प्रकाश, दैदिप्यमान


मुलींची नावे आणि अर्थ


  • संपदा – संपत्ती : धन, संपत्ती, दौलत

  • गरिमा – अनिता : अत्यंत सुंदर पद्धतीने राहणारी, आकर्षक

  • हेमा – हेमाक्षी : सोनेरी नयनांची अशी, सुंदर डोळे असणारी

  • मेघना – मेघा : ढग, ढगांप्रमाणे गडगडणारी