Traditional Bangles Designs For Women : लग्न सराई सगळीकडे सुरू आहे.  साखडपुडा, मेंहंदी हळद, संगीत, लग्नाच्या दिवशी असणारे विविध विधी आणि लग्नाचं रिसेप्शन, पूजा या अशा अनेक कार्यक्रमांसाठी निरनिराळे कपडे आणि दागिन्यांची खरेदी सुद्धा सुरू झाली आहे. या दागिन्यांमध्ये सर्वाचं लक्ष जातं ते म्हणजे हातातील बांगड्यांकडे.
ट्रेडीशनल कपड्यामंवर कोणत्या डिझायनच्या हातात बांगड्या घालायच्या याच्या काही खास डिझाइन्स आज आपण पाहुया...त्याचबरोबर काही सुंदर आणि डिझायनर ब्रेसलेट आहेत, जे तुम्ही ट्रेडिशनल आउटफिट्सवर  घालू शकता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 पर्ल गोल्ड प्लेटेड बांगड्या 

या प्रकारची डिझाईन् तुम्ही ट्रेडिशनल ड्रेसवर घालु शकता. हे ब्रेसलेट लाल आणि हिरव्याचं असतं. यात गोल मोती असतात. तुम्ही हे ब्रेसलेट कोणत्याही कपड्यानंवर घालु शकता. हे तुम्ही हातात बांगड्यांसोबत घालु शकता किंवा फक्त ब्रेसलेट हातात घालु शकता. 

मोत्यांच्या बांगड्या

मोत्यांच्या बांगड्याचा सेट हा ट्रेडिशनल ड्रेसवर सुट होतात. हे असे ब्रेसलेट आहे जे अगदी बांगड्यांसारखे दिसतात. म्हणजे यामुळे बांगड्या घालायची गरज नाही.तुम्ही तुमच्या महागड्या आउटफिट्सवर या प्रकारचे रॉयल बांगड्या कॅरी करू शकता.
तुमच्या आउटफिटशी जुळणारे असे ब्रेसलेट्स हातात घालू शकता. हे ब्रेसलेट दगड आणि रत्नांनी जडलेले आहे आणि त्याच्या कडांवर डिझायनर डिझाइन आहे. यामूळे त्यांनी हे आणखी सुंदर बनवते.


 मोरनक्षी असलेल्या बांगड्या 




मोरनक्षी असलेल्या बांगड्यांमूळे आपल्या एक रॉयल लूक मिळू शकतो. लग्नात नवरीने हिरव्या चुड्यासोबत ही नक्षी असलेली बांगडी घातल्यानं सुंदर लूक येऊ शकतो. 

पारंपारिक बांगड्या 
पारंपारिक अश्या बांगड्या या कोणत्याही साडीवर शोभून दिसतात. साडीवर किंवा ट्रेडिशनल ड्रेसवर तुम्ही या बांगड्या घालू शकता. 

 लीफ स्टाइल ब्रेसलेट




जर तुम्हाला तुमच्या हाताला थोड्या जड असलेल्या बांगड्या घालायला आवडत असतील तर तुम्हाला लीफ स्टाइल ब्रेसलेट डिझाइन नक्कीच आवडेल. ब्रेसलेटवर सोन्या-चांदीची मिश्र शैली अतिशय रॉयल लुक देते.


ब्लॅक कलर ब्रेसलेट 


हे ब्रेसलेट कोणत्याही आउटफिट्सवर शोभून दिसते. बांगड्यांसोबत हे हे ब्रेसलेट  कधीही घालू नका . यावर हे सुट होणार नाही.