Man Scams Hotels Using Dirty Condoms: तुम्ही आतापर्यंत आर्थिक फसवणूक, ऑनलाइन फसवणूक, खोटी माहिती देऊन केलेली फसवणूक असे फसवणुकीचे अनेक प्रकार ऐकले, वाचले असतील. मात्र नुकत्याच समोर आलेल्या एका विचित्र घटनेमध्ये चक्क वापरलेल्या कंडोमच्या माध्यमातून अनेक हॉटेल्सला लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात...


21 वर्षीय तरुणाला अटक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सदर प्रकार चीनमध्ये घडला आहे. येथील एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही व्यक्ती अनेक हॉटेल्सला ब्लॅकमेल करण्याचं काम करत होती. या व्यक्तीच्या ब्लॅकमेलिंगला घाबरुन अनेक हॉटेल्स त्याला हजारो रुपयांचे रुम मोफत राहायला देत होते एवढेच नाही तर ही व्यक्ती या हॉटेल्सकडून पैशांच्या स्वरुपामध्येही लाभ घेत होती. कॉलेजमध्ये दाखला घेण्यासाठी ठेवलेले पैसे अपुरे पडत असल्याने या व्यक्तीने हॉटेल्सची फसवणूक करण्यास सुरुवात केली. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, अटक करण्यात आलेला तरुण हा 21 वर्षांचा आहे. या व्यक्तीचं अडनाव जियांग असं आहे. 


नेमकं काय करायचा हा तरुण?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जियांग हा हॉटेलमध्ये चेक इन करायचा. त्यानंतर रुममध्ये गेल्यावर तो बॅगेतून आणलेली मेलेली झुरळं, वापरलेले कंडोम, केसांचे बुचके रुममध्ये परसवायचा. त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाकडे रुम अस्वच्छ असल्याची तक्रार करायचा. हॉटेल्सही बदनामीला घाबरुन या तरुणाला मोफत राहण्याची ऑफर किंवा थेट पैसे अथवा दोन्ही गोष्टी देण्यास तयार व्हायचे. "मागील 10 महिन्यामध्ये जियांग अनेकदा हॉटेल्समध्ये राहिला आहे. अनेकदा तो एकाच दिवशी तीन ते चार हॉटेलमध्ये चेक इन करायचा. तो स्वत: मेलेले किटक, केसांचे बुचके वापरुन रुममध्ये अस्वच्छता असल्याचं दाखवत याविरुद्ध तक्रार करण्याची किंवा सोशल मीडियावरुन बदमानी करण्याची धमकी द्यायचा. या मोबदल्यात तो मोफत राहण्याची किंवा आर्थिक स्वरुपात तडजोड करायचा," असं पोलिसांनी सांगितलं. 


कसा सापडला?


जियांगने अनेक हॉटेल्सला अशाप्रकारे गंडा घतला. मात्र या तरुणाने एका हॉटेलला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी थेट पोलिसांकडे तक्रार केली. यानंतर हॉटेल मालकांच्या एका सुत्रधाराच्या माध्यमातून जियांग हा अशाप्रकारे अनेक हॉटेलमध्ये मोफत राहिल्याची माहिती समोर आली. सगळीकडेच त्याने आधी तक्रार केली, नंतर ब्लॅकमेलिंग केलं आणि मोफत गोष्टींबरोबरच आर्थिक फायदा घेतल्याचं उघड झालं. "किडे, केसांचा बुचका आणि कंडोम या गोष्टींच्या माध्यमातून तो हॉटेलमधील स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायचा. त्याने असं अनेक हॉटेलबरोबर केल्याचं तपासामध्ये समोर आलं," असं पोलिसांनी सांगितलं.


किती वसुली केली रक्कम आली समोर


पोलिसांनी जियांगला अटक केली तेव्हा त्याच्याकडे रुममध्ये तो ज्या गोष्टी पसवून ठेवायचा त्याची 23 पाकिटं सापडली. तपासामध्ये मागील वर्षभरामध्ये जियांग एकूण 63 हॉटेल्समध्ये 300 वेळा मोफत राहिल्याचं समोर आलं. त्याने या हॉटेल्सकडून एकूण 5200 अमेरिकी डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार, 4 लाख 39 हजार रुपये वसूल केले.