मंदिरा बेदी हे मनोरंजन क्षेत्रातील एक लोकप्रिय नाव. 'शांती' या लोकप्रिय मालिकेनंतर मंदिरा यशाच्या शिखरावर पोहोचली. आज मंदिरा बेदीचा 52 वा वाढदिवस. मंदिरा बेदीचं खासगी आयुष्य कायमच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहीलं. यातील एक कारण म्हणजे तीचा संसार. 14 फेब्रुवारी 1999 रोजी मंदिराने राज कौशल यांच्याशी लग्न केलं. यानंतर 19 जून 2011 साली पहिल्या मुलाला 'वीर'ला जन्म दिला. यानंतर 28 जुलै 2020 रोजी मंदिरा आणि राज यांनी 4 वर्षांच्या मुलीला दत्तक घेतलं. जीचं नाव 'तारा बेदी कौशल' असं ठेवलं. पण यानंतर सुखी संसारावर दुःखाचा डोंगर कोसळला. 30 जून 2021 रोजी राज यांचं हार्ट अटॅकने निधन झालं. 


कोणताच मार्ग नव्हता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अचानक पतीच्या निधनानंतर मंदिराला सावरणं कठीण झालं. गेल्या तीन वर्षांपासून मंदिराचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेल्याचं मंदिरा सांगते. मंदिराकडे कोणताही मार्ग नव्हता. दोन मुलांसाठी तिला कठोर व्हाव लागलं. मी आधीपासूनच ताकदवान होते पण मी आता अधिक ताकदवान झाल्याच मंदिरा सांगते. महत्त्वाचं म्हणजे मंदिरा पुढे सांगते की, तुम्ही अशा परिस्थिती बुडू शकता किंवा पोहू शकता. मी मुलांसाठी या कठिण परिस्थितीत पोहण्याचा मार्ग स्वीकारला. 


आनंद आपल्यातच असतो 


अचानक घरातील मोठा आधार हरपल्याने मंदिरा आणि दोन्ही मुलं एका आघातातून जात होती. अशावेळी मंदिराने सांगितलं की, तिने ताकद आणि आनंदावर फोकस करण्याचा निर्णय घेतला. तसेच ती म्हणजे की, आनंद शोधता येत नाही तो आपल्यातच असतो. हीच बाब तीने मुलांना शिकवली. परिस्थिती स्वीकारून आपल्या जगण्याचा आनंद अनुभवा. एकल पालकांनी देखील मुलांशी संवाद साधून जीवनाचं ध्येय समोर मांडायला हवं. 


आयुष्य जगायला हवे 


अनेकदा जवळच्या व्यक्तीच्या निधनाने पार्टनर कोलमडून जातो. पण मंदिराने जगणं निवडलं आणि मुलांनाही तेच सांगितलं. ती एकाच वेळी दोघांसाठी आई आणि बाबा झाली. आपल्या कामावर फोकस करुन मुलांसाठी जगणं हे तिला आनंददायी वाटते. एकल पालकत्व सांभाळणाऱ्या पालकांनी काही गोष्टी विचारात घेणे गरजेचे आहे.