Marathi Actor Kiran Gaikwad: लोकप्रिय अभिनेता किरण गायकवाड कायमच आपल्या भूमिकेमुळे चर्चेत राहिलेला आहे. किरणने झी मराठीच्या 'लागिर झालं जी' या मालिकेत 'भैय्यासाहेब' हे पात्र लोकप्रिय केलं. यानंतर "देवमाणूस' या मालिकेतील डॉक्टरची प्रमुख भूमिका अतिशय गाजली. यानंतर सिनेमात पदार्पण केलेल्या किरणचा 'चौक' हा सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमातील त्याची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला पडली. या सिनेमा दरम्यानच किरण गायकवाड एका कठिण प्रसंगातून जात असल्याचा त्याने खुलासा केला. 


लग्न मोडलं 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किरण गायकवाडचं सहा महिने ठरलेलं लग्न मोडलं. या सहा महिन्याच्या कालावधीत 3 ते 4 वेळा भेट झाली होती. या काळात मी भावी पत्नीसोबत भविष्याची काही स्वप्न रंगवली होती. सगळं सुरळीत सुरु असताना मला फसवण्यात आलं. यामुळे ठरलेलं लग्न मोडलं. हा काळ अतिशय कठिण होता. या काळात मला डिप्रेशनच्या गोळ्या घ्याव्या लागल्या. किरण गायकवाडने स्वतः केला खुलासा 


डबल डेटिंगचा प्रकार


किरण गायकवाडचं तब्बल सहा महिने लग्न ठरलं होतं. पण ती व्यक्ती डबल डेटिंग करत असल्याचा प्रकार नंतर उघड झाला. हा काळ किरणसाठी अतिशय कठीण होता. एका बाजूला सिनेमाचं शुटिंग सुरु होतं तर दुसरीकडे अशा कठिण प्रसंगाला सामोरं जावं लागत होतं. अशावेळी किरण डिप्रेशनमध्ये गेला होता. 
डॉक्टरने गोळ्या देखील सुरु केल्या होत्या. 


का लागते तिसऱ्या व्यक्तीची गरज 


किरण गायकवाड सांगतो की, या सगळ्या प्रसंगाचा माझ्या जीवनावर खूप मोठा परिणाम झाला. कळत होतं की, आपण चुकीचा विचार करतोय. पण तरी देखील ती परिस्थिती अशी असते की, या काळात आपल्याला तिसऱ्या व्यक्तीची गरज लागते. जे झालं ते चुकीचं झालं, हे सांगायला एक हात पाठीवर हवा असतो. त्यामुळे डिप्रेशनच्या काळात डॉक्टरांची खूप मदत झाल्याचं किरण सांगतो. 


परिस्थिती कशी हाताळाल? 


लग्न मोडणं ही धक्कादायक बाब आहे. पण ही परिस्थिती सांभाळणे गरजेचे असते. 
नेमकं कारण काय हे समजून घ्या. त्या कारणाचा भविष्यावर काय परिणाम झाला असता? याचा विचार करा. 
फसवणूक ही भावनाच त्रासदायक आहे. पण भविष्यात मोठा चुकीचा प्रकार घडण्यापेक्षा ही गोष्ट सुरुवातीलाच झाली हे समजून घेणे असा विचार करावा. 
जवळच्या व्यक्तीशी बोला, मन मोकळं करा. भावना व्यक्त करणे गरजेचे आहे. 
ही परिस्थिती फक्त आपल्यावरच घडली आहे हा विचार मनातून काढून टाका.