नातं कोणतंही असो त्यामध्ये प्रेम आणि विश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. पण जेव्हा हेचं नातं जोडीदाराशी संबंधित असेल तर त्यामध्ये अपेक्षा थोड्या जास्त असतात. कारण आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्याकडून प्रेम, विश्वासासोबतच समजुतदारपणा पण अपेक्षित ठेवतो. हा मुद्दा जर पुरुषांशी संबंधित असेल तर त्यांच्यामध्ये मॅच्युरिटी कमी असल्याचं म्हटलं जातं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुरुष हे अनेकदा गोंधळलेले असतात किंवा त्यांच्याकडे महिलांप्रमाणे मल्टी टास्किंग करण्याची तयारी नसते. इमॅच्युअर पार्टनर आपल्या जोडीदारासाठी अनेक प्रश्न निर्माण करतात, असा अनेकांचा अनुभव असतो.  पण काही पुरुष असे असतात जे अतिशय मॅच्युअर असतात. त्यांच्यामध्ये असलेले 3 मराठी गुण नात्यामध्ये अतिशय महत्त्वाचे ठरतात. 


जोडीदाराला इनसिक्युरिटीपासून दूर ठेवतात 


एक मॅच्युअर पुरुष आपल्या जोडीदाराला कसे सांभाळावे हे चांगलेच ओळखतो. रिलेशनशिपमध्ये विश्वास अतिशय महत्त्वाचा असतो. जर तो नसेल तर नातं कमकुवत होतं. जर नात्यामध्ये इतका समजतुदारपणा नसेल तर नातं ढासळायला वेळ लागत नाही. जर नात्यामध्ये अविश्वास निर्माण झालं तर ते नातं फार काळ टिकत नाही, हे या पुरुषांना माहित असतात. त्यामुळे ते नात्याला अधिक जपतात. 


चूक स्वीकारतो


पुरुषांमध्ये असलेला हा स्वभाव अर्ध्या वादांना सुरुवात होण्यापासूनच रोखतो. कारण चूक कुणाचीही होऊ शकते. पण ती स्वीकारणे अत्यंत आवश्यक असते. कारण नात्यामध्ये जर चूक झाली आणि पुरुषाने ती स्वीकारली तर नातं आणखी घट्ट होतं. नात्यामधील गैरसमज दूर होतील. अनेकदा पुरुष आपली चूक मान्य करत नाहीत किंवा आपलं काही चुकलं असंही त्यांना वाटत नाही. त्यामुळे वाद होत राहतात. पण जे खरे मॅच्युअर पुरुष असतात ते मात्र आपली चूक मान्य करतात. 


बोलून वाद संपवतात


नात्यामध्ये अनेकदा वाद गैरसमज होत असतात. कधी मस्करी मस्करीमध्ये वाद होतो तर कधी एखादी गोष्ट न पटल्यामुळे वाद होतो. वाद हे नात्यामध्ये आवश्यकच आहेत. कारण यांच्याशिवाय नात्यामध्ये मजा नसते. पण जो योग्य पुरुष असतो तो कधीही बोलून वाद संपवतो. नात्यामध्ये संवाद महत्त्वाचा आहे. नातं कोणतंही असो त्यामध्ये संवाद अतिशय महत्त्वाचा आहे.