बाळाची चाहुल ही खूप सुखद गोष्ट आहे. एक नवा जीव, एक नवं व्यक्तिमत्व आपल्यातून घडणार असतं, ही बाब पालकांसाठी खरंच आनंददायी असतं. अशावेळी आपल्या बाळाला युनिक, हटके, कधीही कुणी न ऐकलेलं नाव द्यावं हा विचारच प्रत्येक पालक करत असतो. अशावेळी तुम्ही मॉडर्न आणि युनिक नावांचा विचार करताय. तर ही 10 नावे तुम्हाला नक्कीच आकर्षित करतील. ही नावे फक्त मॉडर्नच आहेत, असं नाही. या नावांचा अर्थ देखील तितकाच खास आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलावरती जन्मानंतरचा पहिला संस्कार म्हणजे 'नामकरण' अशावेळी तो महत्त्वाचा ठरतो. बाळाला जे नाव देतो त्या नावाच्या अर्थाप्रमाणे मुलं घडत जातं. त्यामुळे नाव आणि त्याचा अर्थ देखील तितकाच महत्त्वाचा आहे. 


माहिका - माहिका या नावाचा अर्थ आहे पृथ्वी. पृथ्वी आपली माता आहे. मुलीवर लहानपणापासून हा संस्कार घडणे महत्त्वाचा आहे. माहिका या नावाचा तुम्ही विचार करु शकता. तीन अक्षरी हे नाव नक्कीच खास असेल.  


निहीरा - मुलीचा जन्म हा पालकांसाठी खास असतो. अनेक पालक लेकीच्या जन्माची वाट पाहत असतात. अशावेळी त्या खास मुलीसाठी 'निहीरा' हे नाव अतिशय चपखल बसतं. कारण 'निहीरा' या नावाचा अर्थ आहे नव्याने सापडलेला खजिना. 


ओमशा - ओमशा हे नाव युनिसेक्स नाव आहे. हे नाव तुम्ही मुलीसाठी अथवा मुलासाठी दोघांसाठीही निवडू शकता. या नावाचा अर्थ आहे हसणे, हास्य, आनंदी. आपल्या बाळामध्ये हे दोन्ही गुण असावेत असं वाटत असेल तर या नावाचा नक्की विचार करा. 
 
म्रिदवी - म्रिदवी हे नाव मृदू या शब्दावरुन तयार झालं आहे. या नावाचा अर्थ देखील तसाच आहे. मऊ, नाजूक, सौम्य असा अर्थ असलेलं हे नाव लेकीसाठी नक्कीच निवडा. कारण या नावात दडलाय शांत असा अर्थ 


तिथिरा - अनेक पालकांना संगीताची आवड असते. अशावेळी संगीताशी संबंधित मुलीला नाव ठेवायचे असेल तर 'तिथिरा' या नावाचा नक्की विचार करा. तिथिरा म्हणजे संगीतमय, गाणं. 


आग्नेय - अग्नी किंवा त्याची देवता, अग्नी यांच्याशी संबंधित किंवा संबंधित असा या नावाचा अर्थ आहे. आग्नेय ही दिशा देखील आहे. पण हे युनिक आणि आयकॉनिक असं नाव आहे. 


कुवय - कुवय हे नाव युनिक आहे. कुवय हे एका पक्षाचं नाव आहे. पक्षीप्रेमी, निसर्ग प्रेमी असणाऱ्या पालकांनी आपल्या मुलाचं नाव हे नक्की ठेवावं. 


रक्षित - रक्षित हे नाव देखील युनिक आहे. मुलाला जे नाव देतो तो संस्कार त्याच्यावर घडतो. अशावेळी मुलाने सर्वगुण संपन्न असावं असं वाटत असेल तर 'रक्षित' या नावाचा विचार करावा. 


समुत्क - समुत्क हे नाव थोडं कठिण वाटत असलं तरीही या नावामध्ये खास अर्थ दडलेला आहे. इच्छुक असा या नावाचा अर्थ आहे. प्रेमळ अशा मुलाला द्या हे खास नावं.


दक्ष - मुलासाठी दोन अक्षरी हे नाव अतिशय खास आहे. दक्ष म्हणजे अलर्ट, सतर्क राहणे.