Unique Baby Names on Babasaheb Ambedkar in Marathi: डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, ज्यांना आपण भारतातील नागरिक बाबासाहेब किंवा भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून ओळखतो. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांनी झोपेतच अखेरचा श्वास घेतला. डॉ.आंबेडकरांच्या समाजातील अमूल्य योगदानाचे स्मरण करण्यासाठी हा दिवस संपूर्ण भारतभर महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निमित्त त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे जाणून घेणार आहोत. जी नावे तुम्ही तुमच्या मुलांसाठी देऊ शकता आणि बाबासाहेबांचे विचार त्यांच्यात रुजवू शकता. 


बाबासाहेब 
बाबासाहेब - बाबासाहेब हे नाव डॉ. भीमराव आंबेडकर यांचे नाव आहे. या नावाचा अर्थ आहे आदरयुक्त वडिल किंवा ज्येष्ठ व्यक्ती. हे नाव तुम्ही मुलाला देऊ शकता 


(वाचा - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वंशवेल, जाणून घ्या कोण आहेत कुटुंबातील सदस्य)


रमाबाई
रमाबाई हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव. 'रमाबाई' किंवा 'रमा' हे नाव तुम्ही मुलीसाठी देऊ शकता. हे नाव अतिशय सुंदर आहे. या नावाचा अर्थ आहे रमा या नावाचा अर्थ देवी लक्ष्मी असा होतो. 


सविता 
सविता हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव. 'सविता' या नावाचा अर्थ आहे चंद्र आणि सूर्य. अतिशय जुनं पण वेगळं असं हे नाव असून अर्थ खूप छान आहे. 


यशवंत 
यशवंत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुलाचे नाव आहे. यश म्हणजे किर्ती, किर्तीवंत असं या मुलाचं नाव तुम्ही ठेवू शकता. 


मीराबाई 
मीराबाई हे यशवंत यांच्या पत्नीचे नाव. मीरा असं देखील नाव तुम्ही तुमच्या मुलीसाठी ठेवू शकता. मीरा हे मूळ अरबी नाव आहे ज्याचे अनेक अर्थ आहेत. मीरा नावाचा मराठीत अर्थ हायबॉर्न गर्ल, कुलीन स्त्री.. मराठीत मीरा नावाचा अर्थ, लोकप्रियता आणि रँक आहे. 


गंगाधर 
गंगाधर हे देखील बाळासाहेबांच्या मुलाचे नाव आहे. गंगाधर या नावाचा भगवान शिव यांचे दुसरे नाव असा आहे. 


(हे वाचा - महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार)


रामदेश 
रामदेश हे देखील बाळासाहेबांच्या मुलाचे नाव आहे. 'राम' किंवा 'रामदेश' असे नाव देखील मुलासाठी निवडू शकता. 


राजरत्न 
राजरत्न हे देखील डॉ. भिमराव यांच्या मुलाचे नाव आहे. राजरत्न हे नाव अतिशय वेगळं आहे. मुलासाठी राज नावाऐवजी राजरत्न हे नाव निवडू शकता. 


इंदू 
इंदू हे डॉ. बाबासाहेबांच्या मुलीचे नाव आहे. इंदू हे नाव देखील अतिशय छान, दोन अक्षरी असे आहे. चंद्र असा या नावाचा अर्थ आहे. 


प्रकाश
प्रकाश आंबेडकर हे यशवंत यांच्या मुलाचे नाव आहे. प्रकाश हे नाव देखील जुनं असलं तरीही याचा अर्थ खास आहे. प्रकाश म्हणजे सकारात्मकता. 


अंजली 
अंजली हे त्यांच्या पत्नीचे नाव आहे. या नावावरुन तुम्ही मुलीचे नाव निवडू शकता. 'आदरणीय', प्रार्थनेत दोन्ही हात जोडणारा असा याचा अर्थ आहे. 


भिमराव 
'भिमराव' या नावाचा अर्थ आहे शक्तिशाली आणि मजबूत असा आहे. हे नाव मुलासाठी निवडू शकता. किंवा 'भिमा' असं देखील मुलाला नाव देऊ शकता. 


दर्शना 
दर्शना हे नाव भिमराव यांच्या पत्नीचे नाव आहे. दर्शना या नावाचा अर्थ आहे पाहणे, दृष्टी. हे नाव अतिशय खास आहे. 


आनंदराज 
आनंद किंवा आनंदराज असं नाव मुलाला देऊ शकता. या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे अतिशय सकारात्मक असा या नावाचा अर्थ आहे. 


मनिषा 
मनिषा हे नाव आनंदराज यांच्या पत्नीचे नाव आहे. मनाची देवी; इच्छा असा या नावाचा अर्थ आहे. 


सुजात 
सुजात नावाचा मराठीत अर्थ कुळातील. सुजात नावाचा मराठीत अर्थ, लोकप्रियता आणि रँक आहे. प्रकाश आंबेडकर आणि अंजली आंबेडकर यांच्या मुलाचे नाव सुजात असं आहे. 


प्राची 
रमाबाई यांच्या मुलीचे नाव प्राची असे आहे. सूर्य, सकाळ, पूर्व असा या नावाचा अर्थ आहे. अतिशय गोड असं हे नाव आहे. 


रश्मी 
रश्मी हे नाव देखील रमाबाई यांच्या मुलीचे नाव आहे. 'रश्मी' या नावाचा अर्थ आहे सूर्याचा पहिला किरण, प्रकाशाचा किरण. 


रितिका 
भिमराव आणि दर्शना यांच्या मुलाचे नाव रितिका असा आहे.  हालचाल; सुंदर; गोंडस; पितळ; कांस्य; जो परंपरा ठेवतो असा या नावाचा अर्थ आहे. 


साहिल 
आनंदराज आणि मनिषा यांच्या मुलाचे नाव साहिल असे आहे. अतिशय युनिक आणि ट्रेंडी असे हे नाव आहे. नदीचा किनारा, कोस्ट, मार्गदर्शन असा या नावाचा अर्थ आहे. 


अमन
अमन देखील आनंददाज आणि मनिषा यांच्या मुलाचे नाव आहे. हे देखील अतिशय युनिक आहे. अमन म्हणजे आश्चर्य, शांतता, नायक, प्रामाणिक असा या नावाचा अर्थ आहे.